चाॅकलेट बाॅय बनला अंडरवर्ल्ड डॉन

राकेशनं या चित्रपटात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारली आहे. रोमँटिक हिरोची प्रतिमा असलेल्या राकेशचं आजवर कधीही न पाहिलेलं रूप या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे राकेश त्याची 'चॉकलेट बॉय'ची इमेज पुसणार हे नक्की.

  • चाॅकलेट बाॅय बनला अंडरवर्ल्ड डॉन
  • चाॅकलेट बाॅय बनला अंडरवर्ल्ड डॉन
SHARE

हिंदीसोबतच मराठी चित्रपटांमध्येही मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राकेश बापटचा 'सविता दामोदर परांजपे' हा बहुचर्चित चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. आता तो 'मुंबई आपली आहे' असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
११ जानेवारीला प्रदर्शित 

प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात काहीतरी वेगळं आणि भव्य दिव्य करण्यासाठी धडपडत असते. त्यासाठी ती कोणत्याही प्रकारची धडपड करत असते. या सगळ्यामध्ये कित्येकदा आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी ती हट्टाला पेटते आणि मिळेल तो मार्ग ते निवडते. मग भलेही तो मार्ग चुकीचा का असेना. यातूनच ती मग चुकीच्या मार्गावर जाते. याच संकल्पनेवर आधारित असलेला 'मुंबई आपली आहे'  हा सिनेमा ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. 


अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका

राकेशनं या चित्रपटात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारली आहे. रोमँटिक हिरोची प्रतिमा असलेल्या राकेशचं आजवर कधीही न पाहिलेलं रूप या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे राकेश त्याची 'चॉकलेट बॉय'ची इमेज पुसणार हे नक्की.  यात त्याच्यासोबत मीनल पाटील हा नवीन चेहरा दिसणार आहे. तर हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये दिसणारा इकबाल खान या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. याशिवाय या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, किशोरी शहाणे-वीज, नयन जाधव हे कलाकारही आहेत. 


मुंबईतील गुन्हेगारी

भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा अंडरवर्ल्ड डॉनच्या आयुष्यावर आधारित आहे. मराठी चित्रपटात यापूर्वी कधीही न दिसलेला थरार 'मुंबई आपली आहे' या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. १९९३ मधील मुंबईतील गुन्हेगारी, तत्कालीन मुंबईतील चाळसंस्कृती आणि त्यातून फुलत जाणारी प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळेल. या सिनेमाला रुपेश गोंधळी यांनी संगीत दिलं आहे.हेही वाचा - 

'नशीबवान' भाऊची 'भिरभिरती नजर...'

चार 'बेफिकर' मित्रांची गोष्ट
संबंधित विषय
ताज्या बातम्या