Advertisement

'नशीबवान' भाऊची 'भिरभिरती नजर...'

भाऊच्या 'नशीबवान' चित्रपटातील 'ब्लडी फुल जिया रे...' हे गाणं आणि चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. असं असतानाच, आता या चित्रपटातील 'भिर भिर नजर...' हे दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे.

'नशीबवान' भाऊची 'भिरभिरती नजर...'
SHARES

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने मराठी चित्रपटसृष्टीतील काही चांगल्या कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचं काम केलं आहे. त्यापैकीच एक आहे भाऊ कदम. सध्याचा काॅमेडीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा भाऊ 'नशीबवान' या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार असून, यात त्याची 'भिरभिरती नजर...' प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.


दुसरं गाणं प्रदर्शित

भाऊच्या 'नशीबवान' चित्रपटातील 'ब्लडी फुल जिया रे...' हे गाणं आणि चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. असं असतानाच, आता या चित्रपटातील 'भिर भिर नजर...' हे दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. हे उत्स्फूर्त गाणं अवधूत गांधी यांनी गायलं असून, सोहम पाठक यांनी हे गाणं संगीतबद्ध  केलं आहे. या गाण्याचे बोल शिवकुमार ढाले यांनी लिहिले आहेत. 


सुखद क्षणांचं दर्शन

गाण्यातील शब्दांना साजेसं चित्रीकरण ही या 'भिर भिर नजर...'ची खासियत आहे. वेगळ्या धाटणीचं असणारं हे गाणं भाऊच्या कौटुंबिक आयुष्यात येणाऱ्या सुखद क्षणांचं दर्शन घडवतं. एका सर्वसामान्य कुटुंबात होणारा हा बदल नक्कीच आनंददायी आहे. भाऊ आणि त्याचं कुटुंब या गाण्यात हे भौतिक सुख भरभरून उपभोगताना दिसत आहेत. या गाण्याचं चित्रीकरण रहदारीच्या ठिकाणी आणि अतिशय सहजरित्या करण्यात आलं आहे, त्यामुळे ते अतिशय वास्तववादी वाटत आहे. 


११ जानेवारीला प्रदर्शित

येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना भाऊसोबत मिताली जगताप - वराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे आदींचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.



हेही वाचा -

चार 'बेफिकर' मित्रांची गोष्ट

ही आहे 'दादा, एक गुड न्युज आहे'ची पहिली प्रेक्षक!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा