Advertisement

चार 'बेफिकर' मित्रांची गोष्ट

कॉलेज जीवनातलं आयुष्य धमाल असतं. करिअरचा विचार मनात असला तरी बेधुंदी, बेफिक्रीही असतेच. असंच बेफिकर असलेल्या चार मित्रांची 'आम्ही बेफिकर' या मराठी चित्रपटाद्वारे आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चार 'बेफिकर' मित्रांची गोष्ट
SHARES

चित्रपटांमधील काही विषय ठरलेले असतात. काळ बदलला तरी विषय बदलत नाहीत, मात्र त्या विषयातील निरनिराळे पैलू काळानुरूप बदलत नवनवीन रूपात समोर येत असतात. मैत्री हा देखील असाच एक विषय आहे, जो कायम चित्रपट दिग्दर्शकांना खुणावत असतो. याच मैत्रीची नवी व्याख्या मांडत 'आम्ही बेफिकीर' हा चित्रपट चार मित्रांची गोष्ट सांगणार आहे.


पोस्टर लाँच

कॉलेज जीवनातलं आयुष्य धमाल असतं. करिअरचा विचार मनात असला तरी बेधुंदी, बेफिक्रीही असतेच. असंच बेफिकर असलेल्या चार मित्रांची 'आम्ही बेफिकर' या मराठी चित्रपटाद्वारे आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचं नुकतंच सोशल मीडियाद्वारे टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, पोस्टरवरून हा चित्रपट युथफुल आणि धमाल असल्याची अंदाज बांधता येतो.


मैत्रीवर आधारित 

या चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांनी केलं असून, संगीत प्रणय अढांगळे यांचं आहे. खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावलं आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवलं या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपट मैत्रीवर आधारित असल्याने तरुणाईला आकर्षित करेल, त्यासोबतच इतर वयोगटातील प्रेक्षकांनाही नक्कीच खुणावेल.


नव्या पिढीचा विषय 

सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी 'आम्ही बेफिकर' या चित्रपटात दिसणार आहे. सुयोग आणि मिताली यांनी बऱ्याच मालिका-चित्रपटांतून काम केलं आहे. मात्र, 'आम्ही बेफिकर' हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासोबत राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. त्यामुळे नव्या दमाच्या कलाकारसोबत नव्या पिढीचा विषय मांडणारा हा चित्रपट असल्याचं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.हेही वाचा - 

ही आहे 'दादा, एक गुड न्युज आहे'ची पहिली प्रेक्षक!

एक मार्चला दरवळणार 'परफ्युम'
संबंधित विषय
Advertisement