Advertisement

ही आहे 'दादा, एक गुड न्युज आहे'ची पहिली प्रेक्षक!

अनुजा चव्हाण ही 'दादा, एक गुड न्युज आहे' या नाटकाच्या स्पर्धेची भाग्यशाली विजेती ठरली असून, या नाटकाची ती पहिली प्रेक्षक देखील बनली आहे. अनुजा ही ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजची विद्यार्थीनी आहे.

ही आहे 'दादा, एक गुड न्युज आहे'ची पहिली प्रेक्षक!
SHARES

बहीण भावाच्या नि: स्वार्थ नात्याची हळवी गोष्ट 'दादा, एक गुड न्युज आहे' या नाटकातून लवकरच रंगभूमीवर येणार आहे. याच नाटकासंदर्भात नाटकाच्या टीमने एक स्पर्धा घेऊन नाटकाशी संबंधीत एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्याला नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचं तिकीट भेट म्हणून देण्यात येणार होतं. या स्पर्धेच्या विजेत्याचं नाव आता जाहीर करण्यात आलं आहे. 


अनुजा चव्हाण भाग्यशाली विजेती

अनुजा चव्हाण ही 'दादा, एक गुड न्युज आहे' या नाटकाच्या स्पर्धेची भाग्यशाली विजेती ठरली असून, या नाटकाची ती पहिली प्रेक्षक देखील बनली आहे. अनुजा ही ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजची विद्यार्थीनी आहे. 'दादा, एक गुड न्युज आहे' या नाटकाचं तिकीट अनुजाला उमेश कामत, ऋता दुर्गुळे या कलाकारांसोबत दिग्दर्शक अद्वैत दादरकर, लेखिका कल्याणी पाठारे आणि या नाटकाची सादरकर्ती प्रिया बापट यांच्या हस्ते देण्यात आलं. 


धाडसी विषयावरील नाटक

या नाटकाच्या निमित्ताने प्रिया बापटने नाट्य निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. एखाद्या वेगळ्या आणि धाडसी विषयावरील नाटकाद्वारे निर्मितीकडे वळण्याचा निर्णय प्रियाने घेतला आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केलं असून, नंदू कदम निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं आहे. आरती मोरे, ऋषी मनोहर कलाकारांचाही समावेश नाटकात आहे.



हेही वाचा - 

Exclusive : प्रियाच्या 'त्या' पोस्टने केला अनेकांचा 'पोपट'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा