Advertisement

एक मार्चला दरवळणार 'परफ्युम'

नवे आशय-विषय हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्यं. आता 'परफ्युम' असं सुवासिक शीर्षक असलेल्या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी १ मार्चला प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाँच करण्यात आलं.

एक मार्चला दरवळणार 'परफ्युम'
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या आशयावरील चित्रपट बनत असतात. यापैकी काही चित्रपटांचं शीर्षकच खूप मनमोहक असतं. असाच एक 'परफ्युम' नावाचा सुगंधी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.


पोस्टर  लाँच 

नवे आशय-विषय हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्यं. आता 'परफ्युम' असं सुवासिक शीर्षक असलेल्या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी १ मार्चला प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाँच करण्यात आलं. या छोटेखानी सोहळ्याला चित्रपटातील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. 'हलाल' या बहुचर्चित, गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या, तसंच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'लेथ जोशी' या चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी 'परफ्युम'ची प्रस्तुती केली आहे.


सस्पेन्स-थ्रीलर प्रेमकहाणी 

ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये असून, पोस्टरवरून ही सस्पेन्स-थ्रीलर प्रकारातील प्रेमकहाणी असल्याचं जाणवतं. त्यामुळे कथानकात काय काय वळणं असतील याची उत्सुकता या पोस्टरवरून सहजपणे निर्माण होते. त्याशिवाय पोस्टरवरील रंगसंगतीमुळे ही कथा अत्यंत रंगीबेरंगी आणि व्हायब्रंट असेल, असाही अंदाज आपल्याला लावता येतो. म्हणूनच हा 'परफ्युम' चित्रपटगृहांमध्ये दरवळल्यानंतर प्रेक्षकांना आकर्षित करतो का ते पाहायचं आहे. 


करण तांदळेंचं दिग्दर्शन

कॅमेरामन करण तांदळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा किशोर गिऱ्हे यांनी लिहिली आहे. ओंकार आणि मोनालिसा यांच्यासोबत चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे, शिल्पा ठाकरे, हिना पांचाळ आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.



हेही वाचा - 

संदीप कुलकर्णी निर्मात्याच्या भूमिकेत

वैभवसोबत अमृता-सई निघाल्या 'पॉंडिचेरी'ला...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा