Advertisement

वैभवसोबत अमृता-सई निघाल्या 'पॉंडिचेरी'ला...

सध्या मराठीतील हॅाट कलाकारांमध्ये सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरसोबतच वैभव तत्त्ववादी या अभिनेत्याच्यााही समावेश होतो. हे तिघे मिळून नवीन वर्षात 'पाँडिचेरी'ला जाणार आहेत.

वैभवसोबत अमृता-सई निघाल्या 'पॉंडिचेरी'ला...
SHARES

आपल्या आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री सध्या काय करत आहे याची उत्सुकता चाहत्यांप्रमाणेच चित्रपटसृष्टीतील सर्वांनाच असते. आजच्या काळात सोशल मीडियामुळे आपला आवडता कलाकार काय करतोय हे जाणून घेणं सोपं झालं आहे. सध्या मराठीतील हॅाट कलाकारांमध्ये सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरसोबतच वैभव तत्त्ववादी या अभिनेत्याच्यााही समावेश होतो. हे तिघे मिळून नवीन वर्षात 'पाँडिचेरी'ला जाणार आहेत.


आघाडीचे कलाकार एकत्र 

अमृता, सई आणि वैभव नवीन वर्षाची सुरुवात एका वेगळ्या पद्धतीने करणार आहेत. ते पाँडिचेरीला जाणार आहेत... भटकंती करायला नव्हे, तर चित्रीकरणासाठी. कारण या तिघांच्या आगामी मराठी चित्रपटाचं शीर्षकच 'पाँडिचेरी' आहे. नेहमीच विविधांगी विषयावर आधारित तसंच नावीन्यपूर्ण शीर्षक असलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा सचिन कुंडलकर 'पाँडिचेरी'चा दिग्दर्शक आहेत. या निमित्ताने सचिनने पुन्हा एकदा मराठीतील आघाडीच्या कलाकारांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे.


चित्रीकरणाला लवकरच सुरुवात

या चित्रपटाच्या निमित्ताने अमृता प्रथमच दिग्दर्शक सचिन कुंडलकरसोबत काम करणार आहे. 'पाँडिचेरी'च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून, सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्ट रिडींगचं काम सुरू आहे. सचिनसह कलाकारांनीही या चित्रपटाच्या स्क्रीप्ट रीडींगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्या नीना कुलकर्णीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 'गंध' या चित्रपटानंतर १० वर्षांनी नीना कुलकर्णी यांच्यासोबत काम करायला मिळत असल्याचा आनंद सचिनने फेसबुकवर व्यक्त केला आहे.



हेही वाचा - 

तिहेरी भूमिकेत झळकणार डाॅ. अमोल कोल्हे

कोण आहे हा 'रॉकी'?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा