Advertisement

कोण आहे हा 'रॉकी'?

'सळसळतं रक्त आणि अंगात रग, वाटेला गेलात याच्या तर बाजार उठलाच म्हणून समजा', असा इशारा देत 'रॉकी' सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. या टीजर आणि पोस्टरमुळे या चित्रपटाबाबतीत प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. पोस्टरवर दिसणारा पिळदार शरीरयष्टीचा हा तरुण नेमका आहे तरी कोण? हा प्रश्न सिनेवर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

कोण आहे हा 'रॉकी'?
SHARES

पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील नायकाची व्याख्या फार वेगळी होती. ज्याला अभिनयाची जाण आहे तो नायक, मग तो दिसायला काळा-सावळा का असेना. काळानुरूप मराठी चित्रपटातील नायकाची व्याख्याही काहीशी बदलत गेल्याचं चित्र पाहायला मिळतं. मागील काही वर्षांपासून पिळदार शरीरयष्टी असलेल्या नायकांची मराठीत एंट्री होत असल्याने अॅक्शनपॅक्ड चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. याच वाटेवरील 'रॅाकी' हा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


नवा अॅक्शनपट

आजच्या तरुणाईला अॅक्शनपटांचं विशेष आकर्षण आहे. अॅक्शनच्या जोडीला इमोशन आणि ठसकेबाज संवाद हे समीकरण जुळलं की तरुणाईला तो चित्रपट आवडतो. याचीच जाणीव ठेवत मराठीतही ठराविक अंतराने अॅक्शनपट येत आहेत. या अॅक्शनपटांना म्हणावं तसं यश मिळालं नसलं तरी भविष्यात मात्र अशा प्रकारचे चित्रपटही मराठी प्रेक्षकांवर मोहिनी घालण्याची किमया करण्याची चिन्हं दिसत आहेत. असाच अॅक्शन आणि इमोशनने परिपूर्ण असलेला 'रॉकी' हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.


पोस्टर लाँच

'सळसळतं रक्त आणि अंगात रग, वाटेला गेलात याच्या तर बाजार उठलाच म्हणून समजा', असा इशारा देत 'रॉकी' सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. या टीजर आणि पोस्टरमुळे या चित्रपटाबाबतीत प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. पोस्टरवर दिसणारा पिळदार शरीरयष्टीचा हा तरुण नेमका आहे तरी कोण? हा प्रश्न सिनेवर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाची निर्मिती ड्रिम व्हिवर प्राॅडक्शन्स आणि सेवेन सीज प्राॅडक्शन्स यांची असून प्रस्तुती पेपरडॉल एन्टरटेन्मेंट यांची आहे.


नवा चेहरा

अदनान शेख यांनी 'रॅाकी'ची कथा-पटकथा लिहिली असून, दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच पार पाडली आहे. आज दिवसागणिक एक नवीन चेहरा चित्रपटसृष्टीत दाखल होत असताना 'रॅाकी'च्या माध्यमातून आता हा कोण नवीन कलाकार रुपेरी पडद्यावर झळकणार आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना लवकरच मिळेल.हेही वाचा-

दिग्दर्शनाकडे वळले अभिनेते श्रीरंग देशमुख

Exclusive Interview: अबरामसारखा निरागस आहे बऊआ - शाहरुख खानसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा