Advertisement

पूजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित


पूजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित
SHARES

मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली आहे. तिच्या अभिनय कौशल्याला चारचाँद लावणाऱ्या या पुरस्कारांच्या यादीत आणखी एक मानाचा पुरस्कार सामील झाला आहे. भारतीय चित्रपटाचे जनक दादा साहेब फाळके पुरस्काराने पूजाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावाजण्यात येणार आहे.


दादा साहेब फाळके यांच्या १४९व्या जयंतीप्रित्यर्थ स्माईल फाउंडेशनद्वारे पुरस्कार आयोजित करण्यात येत आहे. येत्या २१ एप्रिलला वांद्रे येथील सेंट अँड्रयूज ऑडीटोरियममध्ये पुजाला हा पुरस्कार प्रधान करण्यात येईल.

स्माईल फाऊंडेशनच्या अखत्यारीत देण्यात येणारा हा पुरस्कार दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबियांकडून चित्रपटसृष्टीतील यशस्वी कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येतो. त्यानुसार यावर्षीचा हा मान 'लपाछपी' सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पूजाला मिळाला आहे.


पूजाच्या यशाचा चढता आलेख

केवळ भारतातूनच नव्हे तर, जगभरातून ‘लपाछपी’ आणि पुजा सावंतच्या अभिनयाची दखल घेतली जात आहे. ‘श्रावणक्वीन’ झाल्यानंतर पुजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘क्षणभर विश्रांती’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यानंतर 'झकास’, 'सतरंगी रे’, 'पोस्टर बॉईज', 'निळकंठ मास्टर’, 'दगडी चाळ’, 'भेटली तु पुन्हा’, 'लपाछपी' या चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा