Advertisement

'चिठ्ठी'मध्ये 'दिलवाले'चा फील


'चिठ्ठी'मध्ये 'दिलवाले'चा फील
SHARES

चिठ्ठी या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर लाँच करण्यात आला होता. आता या सिनेमाचा पोस्टरही रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटातून अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि अभिनेता शुभंकर एकबोटे ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशाल डांगेंच्या निर्मितीखाली बनवण्यात आलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन वैभव डांगे यांनी केलं आहे.


दिलवाले सिनेमाचे सीन्स 'चिठ्ठी'मध्ये

९०च्या दशकात गाजलेल्या दिलवाले या चित्रपटातील सीन्स चिठ्ठी या चित्रपटात घेतले आहेत. यासाठी रितसर परवानगी घेण्यात आली होती. 'दिलवाले' या सिनेमातील संवाद, गाणी आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. आमच्या चित्रपटात दिलवालेचा महत्त्वाचा संदर्भ आहे. कारण या चित्रपटातील अभिनेत्यावर दिलवालेचा प्रभाव झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील.
- वैभव डांगे, दिग्दर्शक

स्वरदा बुरसे आणि सुजय जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन केलं आहे. चिठ्ठी या चित्रपटात एक भन्नाट प्रेमकथा पहायला मिळणार आहे. एका तरुणानं त्याच्या प्रेयसीला पाठवलेली चिठ्ठी तिला मिळतच नाही. त्यामुळे जो गाेंधळ उडाला त्यावर हा चित्रपट आधारीत आहे. १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा