प्रथमेश-सिद्धार्थच्या 'खिचिक’ची उत्सुकता

‘टकाटक’च्या यशानंतर अभिनेता प्रथमेश परब पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. सिद्धार्थ जाधवसोबतच्या त्याच्या ‘खिचिक’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

प्रथमेश-सिद्धार्थच्या 'खिचिक’ची उत्सुकता
SHARES

‘टकाटक’च्या यशानंतर अभिनेता प्रथमेश परब पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. सिद्धार्थ जाधवसोबतच्या त्याच्या ‘खिचिक’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.


अतरंगी लूक

काही चित्रपट पोस्टर आणि त्यावर वेगवेगळ्या रूपात दिसणाऱ्या चेहऱ्यांमुळे चर्चेत येतात. मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘खिचिक’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब या पोस्टरवर दिसत असून, त्यांचा अतरंगी लूक लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळं शीर्षकापासूनच वेगळेपणा असलेला हा चित्रपट नेमका आहे तरी कसा? याबाबत सर्वांनाच उत्सुकता वाटत आहे.


सिद्धार्थनं बांबू घेतला

‘टकाटक’ या चित्रपटात ठोक्या बनून संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर प्रथमेश आता एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहे. या चित्रपटात त्याच्या जोडीला सिद्धार्थ जाधव आहे. याशिवाय सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण, यश खोंड आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. या पोस्टरवर सिद्धार्थच्या हाती गिटार आहे, तर सिद्धार्थनं बांबू घेतला आहे. अतरंगी लूकमधील प्रथमेश-सिद्धार्थच्या मध्ये दोन लहान मुलं आहेत. त्यातला एक मुलगा मागे लावलेल्या फोटोंकडे पाहात आहे.


२० सप्टेंबरला प्रदर्शित

पोस्टरवरून तरी चित्रपटाची कथा काय असेल, याचा अंदाज बांधता येत नाही. २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रीतम एसके पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. योगेश कोळीनं छायांकन, अमित मलकानी आणि रोहन पाटीलनं संकलन, अभिषेक-दत्तानं संगीत दिग्दर्शन, ध्वनी आरेखन राशी बुट्टे , नितीन बोरकरनं कला दिग्दर्शन, विजय गवंडेनं पार्श्वसंगीत केलं आहे. सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.हेही वाचा  -

Movie Review: 'मंगळ' ग्रहाच्या प्रवासाची 'सुमंगल' कहाणी

मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे
संबंधित विषय