Advertisement

‘अबलख’मध्ये पुन्हा झळकणार प्रार्थना-अनिकेतची जोडी


‘अबलख’मध्ये पुन्हा झळकणार प्रार्थना-अनिकेतची जोडी
SHARES

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘मस्का’ या सिनेमात अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहरे ही 'मस्के'दार जोडी दिसली होती. हीच जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘अबलख’ या आगामी मराठी सिनेमासाठी अनिकेत आणि प्रार्थना पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.


चार मित्रांची कथा

‘अबलख... एकदा तरी लागतोच’ आयुष्यात या अनुभवातून प्रत्येकजण कधी ना कधी जातोच. अशीच गमतीशीर कथा घेऊन अनिकेत आणि प्रार्थना आपल्यासमोर लवकरच येत आहेत. स्वप्नं माणसाला जगायला शिकवतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सर्वचजण धडपड करत असतात. अशाच स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा ‘अबलख’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे.


शूटिंग ऑक्टोबरपासून

आनंद शिवाजी चव्हाण दिग्दर्शित या सिनेमात प्रार्थना आणि अनिकेत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘मस्का’ सिनेमानंतर अनिकेत आणि प्रार्थनाचा हा दुसरा सिनेमा आहे. आयुष्य हा एक प्रवास असून, या प्रवासाचा आनंद उपभोगता आला पाहिजे, असा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना योग्य प्रकारे तोंड देऊन प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही या सिनेमात मांडण्यात आलं आहे. ऑक्टोबरपासून या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा