Advertisement

हॉस्टेलच्या आठवणी ताज्या करण्यासाठी येतोय 'हॉस्टेल डेज'!


हॉस्टेलच्या आठवणी ताज्या करण्यासाठी येतोय 'हॉस्टेल डेज'!
SHARES

प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांनी आत्तापर्यंत बावरे प्रेम हे, लग्न पाहावे करून आणि सतरंगी रे यांसारखे गाजलेले चित्रपट दिल्यानंतर ते आता पुन्हा एकदा 'हॉस्टेल डेज' या आगामी चित्रपटातून रसिकांसमोर येत आहेत. या सिनेमात प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय टांकसाळे आणि संजय जाधव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमधून दिसणार आहेत.



हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्दल नेहमीच कुतुहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली कि कोणीही नॉस्टॅल्जिक होतोच," असे उद्गार या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना अजय नाईक यांनी काढले.

कॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक वेगळा असा चित्रपट आहे. म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.



चित्रपटाचे निर्माते सुभाष बोरा म्हणाले, "ही हॉस्टेलमधील आयुष्यावर बेतलेली गोष्ट आहे. ती १९९० च्या दशकात आकाराला येते. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते, स्मार्ट फोन नव्हते, केबल टीव्ही नव्हता कि डिश टीव्ही नव्हता. इंटरनेट तर नव्हताच नव्हता. त्यामुळेच आयुष्यात खूप मजा होती. म्हणूनच आजच्या प्रेक्षकांना त्यावेळच्या अगदी सोप्या सरळ गोष्टींची आठवण हा चित्रपट पाहताना होईल."



हेही वाचा

प्रार्थना बेहेरे अडकली लग्नगाठीत!

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा