Advertisement

अमेरिकेतील मराठमोळ्या इंजिनीअरची मराठी सिनेसृष्टीत एंट्री


अमेरिकेतील मराठमोळ्या इंजिनीअरची मराठी सिनेसृष्टीत एंट्री
SHARES

‘शुभ लग्न सावधान’ या मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत एक नवा चॉकलेट बॉय दाखल होणार आहे. पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाद्वारे प्रतिक देशमुख हा नवा चेहरा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.


प्रतिकला अभिनयाचं वेड

मूळचा पुण्याचा असलेला प्रतिक मागील काही वर्षे अमेरिकेमध्ये स्थायिक होता, पण अभिनयाचं वेड त्याला अमेरिकेत स्वस्थ बसू देईना. याबाबत प्रतिक म्हणाला, आमचं कुटुंब शिक्षणाला खूप महत्त्व देणारं आहे. त्यामुळे अभिनयात रस असूनही शिक्षण पूर्ण करून मी वॉशिंग्टन डिसीमध्ये सॅटेलाइट इंजिनीअरची नोकरी करत होतो, पण लहानपणापासून असलेलं अभिनयाचं वेड मला परत मातृभूमीत घेऊन आलं. अखेर मी शेवटी माझ्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश करत असल्याचा वेगळाच आनंद होत आहे.


मराठीला प्राधान्य

यापूर्वी प्रतिकने अनुपम खेर यांच्या अॅक्टर प्रिपेअर्समधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. एवढंच नाही तर, ‘विशेष फिल्म्स’मध्ये सिनेमा आणि वेबसीरिजसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचंही काम केलं आहे. सर्वसाधारणपणे बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यावर कलाकार हिंदी सिने-टेलिव्हिजनसृष्टीतच डेब्यू करणं पसंत करतात, पण प्रतिकने मराठी सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण करण्याला प्राधान्य दिलं आहे.


मराठी सिनेमा अधिक आशयगर्भ

मराठी सिनेमाबाबतचं आपलं मत व्यक्त करताना प्रतिक म्हणाला, मराठी सिनेमा अधिक आशयगर्भ आहे. अभिनयाची चांगली जाण असलेले उत्तमोत्त्तम कलाकार इथे आहेत. त्यामुळे अभिनयाचा पाया मजबूत करायचा असेल, तर अशा कलाकारांसोबत काम करणं गरजेचं आहे. ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमामुळे मी सुबोध भावे, गिरीश ओक, निर्मिती सावंत अशा नामवंत कलाकारांसोबत काम करू शकलो, याचा मला विशेष आनंद आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा