Advertisement

मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड ‘या’ चित्रपटाच्या नावे

या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे नाव शिरोपेचात रोवले गेले आहे.

मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड ‘या’ चित्रपटाच्या नावे
SHARES

पुगळ्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म २०२१चा (Moscow International Film Festival 2021) बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड मिळाला आहे. या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे नाव शिरोपेचात रोवले गेले आहे.

याशिवाय जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ४५ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन या सन्मानाबद्दल माहिती दिली आहे.

या चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शक विनोद सॅम पीटर म्हणतात की, ‘या मराठी चित्रपटाच्या कथेला इतका मोठा पुरस्कार मिळाल्याचं पाहून खूप आनंद होत आहे. तसंच मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जिंकणे माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूपच अभिमानास्पद आहे’.

खरं तर एका शॉर्ट फिल्मसाठी डॉ. सुनिल खराडे यांनी ‘पुगळ्या’ ही पटकथा लिहिली होती. मात्र, कथा लिहिल्यानंतर त्यांना या कथेवर चांगला चित्रपट होऊ शकतो, असं त्यांच्या मनात विचार आले आणि त्यांनी चित्रपट काढला.

निर्माते म्हणतात की, ‘हा चित्रपट मुलांच्या आणि कुत्र्याच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांचे वय १० वर्ष आहे. यामध्ये वृषभ आणि दत्ता ही दोन मुले दाखवण्यात आली असून यातील वृषभ हा शहरी भागातला आहे. तर दत्ता हा ग्रामीण भागातला असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

दोघंही एकमेकांना कधीच भेटलेले नाहीत. पण, या दोघांना पण कुत्रा पाळण्याची खूप इच्छा असते. त्यातच वृषभला कुत्रा भेट म्हणून मिळतो. मात्र, एक दिवस वृषभकडून तो कुत्रा हरवतो आणि तोच कुत्रा दत्ताला सापडतो’, अशी ही कथा आहे’.

इटली, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील १९ चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाची निवड झाली आहे. तसेच कॅलिफोर्निया इथं झालेल्या वर्ल्ड प्रीमिअर फिल्म अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पुगळ्या’ या चित्रपटानं बाजी मारली आहे.



हेही वाचा

अभिनेत्री, लेखिका शर्वाणी पिल्लईची नवी इनिंग!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा