Advertisement

'या' नव्या जोडीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण


'या' नव्या जोडीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण
SHARES

रुपेरी पडद्यावर आजवर बऱ्याच जोड्या लोकप्रिय झाल्यात. यातील सर्व जोड्या कधी ना कधी प्रथमच एकत्र आल्या. त्यातील अनेकांनी ऑनस्क्रीन केमेस्ट्रीच्या बळावर रसिकांना मोहिनी घातली आहे. आर. पी. प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी चित्रपटातील ऋषभ आणि पूजा ही नवी जोडी रसिकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडीचा हा पहिलाच चित्रपट आहे.

नवीन असल्यामुळे सुरुवातीला काम करताना अवघडल्यासारखं वाटलं, पण दिग्दर्शक दिपक कदम यांनी आम्हाला समजून घेतल्यामुळे काम करताना मजा आली. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून आमची केमेस्ट्री प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे.


२३ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

‘अॅट्रॉसिटी’ या कायद्याबाबत समाजात जागृती व्हावी या उद्देशाने डॉ. राजेंद्र पडोळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर याचं दिग्दर्शन दिपक कदम यांनी केलं आहे. या चित्रपटात यतिन कार्येकर, विजय कदम, गणेश यादव, लेखा राणे, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, निखिल चव्हाण, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा संकल्पना डॉ. राजेंद्र पडोळे यांची असून राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं असून छायांकन राजेश सोमनाथ तर संकलन विनोद चौरसिया यांचं आहे. या चित्रपटातील संगीत अमर रामलक्ष्मण यांचे आहे. हा सिनेमा २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा