Advertisement

'या' मुलानं वडिलांसाठी बनवला चित्रपट

आई-वडीलांच्या उपकारांचं ओझं उतरवरत काही मुलं आपल्या पालकांचं स्वप्न साकार करण्याला प्राधान्य देतात. सचिन धकाते या मुलानं आपल्या वडीलांसाठी चक्क सिनेमा बनवला आहे.

'या' मुलानं वडिलांसाठी बनवला चित्रपट
SHARES

आई-वडिलांच्या उपकारांचं ओझं उतरवत काही मुलं आपल्या पालकांचं स्वप्न साकार करण्याला प्राधान्य देतात. सचिन धकाते या मुलानं आपल्या वडिलांसाठी चक्क सिनेमा बनवला आहे.  


खिचिकची निर्मिती

मराठी चित्रपटसृष्टीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत नजर टाकल्यास असं लक्षात येतं की, बऱ्याच कलाकारांनी आपल्या मुलांना लाँच केलं आहे, पण एखाद्या मुलानं आपल्या वडिलांना लाँच केल्याचं उदाहरण कुठंही आढळणार नाही. अनिल धकाते आणि सचिन धकाते हे पिता-पुत्र मात्र याला अपवाद ठरले आहेत. सचिन धकाते या मुलानं वडील अनिल धकाते यांच्यासाठी ‘खिचिक’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये अनिल एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


अशिक्षित आजोबांची व्यक्तिरेखा

सचिन यांनी कांतानंद प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रीतम एसके पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या अनिल यांनी शासकीय सेवेत उच्च पद भूषवलं आहे. चित्रपट किंवा कला क्षेत्राशी निगडीत कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांच्या मनात या क्षेत्राविषयी कुतुहल आणि प्रेम होतं. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचं काम त्यांचा मुलगा सचिन यांनी केली आहे. या चित्रपटात अनिल यांनी अशिक्षित आजोबांची व्यक्तिरेखा निभावली आहे.


संवेदनांचे पदर 

मुलानं केलेल्या इच्छापूर्तीनंतर अनिल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. याबद्दलच्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ अशी एक म्हसंवेदनांचे पदर ण प्रचलित आहे. मात्र, मुलानं माझ्यातील अभिनय गुण किंवा या क्षेत्राविषयीची आवड ओळखली होती. त्यामुळं माझ्यासाठी चित्रपट निर्मिती करण्याची त्याची इच्छा होती. 'खिचिक'ची संहिता त्याच्याकडं आल्यावर त्यातल्या आजोबांच्या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. व्यक्तिरेखा फार उत्तम असून, याला संवेदनांचे विविध पदर आहेत. एका अशिक्षित व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी माझ्यासारख्या सुशिक्षित माणसानं खूप कष्ट घेतल्याचं अनिल म्हणाले. त्यांच्या सोबत या सिनेमात सिद्धार्थ जाधव, सुदेश बेरी, प्रथमेश परब आदी कसलेल्या कलाकारांची फळी या चित्रपटात आहे.हेही वाचा -

या कलाकारांनी बांधल्या ‘साता जल्माच्या गाठी’

... म्हणून मला चित्रपटांचे सिक्वेल आवडत नाहीत : आयुषमान खुराना
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा