Advertisement

सचिन पिळगावकर आता राजकारणाच्या 'रणांगणा'तले डावपेच खेळणार


सचिन पिळगावकर आता राजकारणाच्या 'रणांगणा'तले डावपेच खेळणार
SHARES

शिक्षण... आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग... आणि त्यात शिक्षणमंत्र्याची भूमिका ही एक जबाबदारीच... हीच जबाबदार व्यक्तिरेखा सचिन पिळगांवकर साकारत आहेत. शिक्षणसंस्थांमधील राजकारणाची हलकी झलक 'रणांगण' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 


रणांगणचा लूक पोस्टर लाँच

गेली कित्येक वर्ष हिंदी-मराठी सिनेसृष्टीत बालकलाकार ते दिग्दर्शक अशा सगळ्याच भूमिका लिलया पेलणारे सचिन पिळगावकर आता राजकारणाच्या रणांगणातले डावपेच तितक्याच ताकदीने खेळताना दिसतील. नुकताच लाँच झालेल्या लूक पोस्टरमध्ये सचिन पिळगावकरांची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आली आहे.


कोण असतील कलाकार?

शैक्षणिक रणांगणात पेटलेलं हे राजकारण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रणांगणात सचिन पिळगांवकरांसमोर स्वप्नील जोशी असणार आहे. त्याचबरोबर सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, आनंद इंगळे, प्रणाली घोगरे आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ५२ विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स्) आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे. तर अर्जुन सिंहबर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा