प्रेमाच्या गुलाबी रंगात रंगले संदीप-अक्षया

'रॅाकी' या सिनेमाचा नायक बनलेला संदिप सध्या अॅानस्क्रीन नायिका असलेल्या अक्षया हिंदळकरसोबत प्रेमाचे गुलाबी रंग उधळण्यात मग्न आहे.

SHARE

'टॅार्चमन बनला सिनेमाचा नायक' या मथळ्याखाली आम्ही एक बातमी दिली होती. ज्यात संदिप साळवे नावाच्या एका टॅार्चमनचा नायक बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास उलगडण्यात आला होता. 'रॅाकी' या सिनेमाचा नायक बनलेला संदिप सध्या अॅानस्क्रीन नायिका असलेल्या अक्षया हिंदळकरसोबत प्रेमाचे गुलाबी रंग उधळण्यात मग्न आहे.


'राॅकीं'ग जोडी

फेब्रुवारी महिना आला की, जगभरातील तरुणाईला 'व्हॅलेंटाइन डे'चे वेध लागतात. प्रेमी युगुलं 'व्हॅलेंटाईन्स डे' साजरा करण्यासाठी विविध योजना आखतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला खुश करण्याचा तो दिवस असतो. या गोड-गुलाबी रंगाची झलक मराठी चित्रपटात दिसली नाही तर नवलच. 'रॉकी' या मराठी चित्रपटाला एका प्रेमकथेची पार्श्वभूमी आहे. अॅक्शन, रोमान्स, ड्रामा आणि इमोशननं परिपूर्ण असलेला 'रॉकी' मधील संदिप-अक्षया ही जोडीही सध्या 'व्हॅलेंटाइन डे'चं औचित्य साधत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.


असं असतं प्रेमाचं नातं

'प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं' असं म्हणत प्रेमासाठी लढणाऱ्या एका युवकाची कथा 'रॉकी'मध्ये आहे. या चित्रपटाद्वारे संदीप आणि अक्षया ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाबाबत अक्षया म्हणते की, प्रेमाला विश्वासाची साथ मिळाली की, त्या बळावर माणूस काहीही साध्य करू शकतो. हेच आम्ही 'रॉकी' चित्रपटात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रेमावर विश्वास ठेवा आणि त्याला साथ द्या. 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने संदिपनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, प्रेम ही खूप व्यापक संकल्पना आहे. 'रॉकी'ची कथासुद्धा प्रेमाच्या पार्श्वभूमीवर खुलते, प्रेमाकडे संकुचित दृष्टीकोनातून न बघता त्याची व्यापकता आपण जाणून घेतली पाहिजे.


नवोदित दिग्दर्शक

'रॉकी'चं दिग्दर्शन अदनान ए. शेख या नवोदित तरुण दिग्दर्शकानं केलं आहे. कथालेखन अदनानने विहार घाग यांच्यासोबत केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनानची आहे. राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून, समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांनी संगीत दिलं आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी-मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे.हेही वाचा -

टाॅर्चमन संदिप बनला सिनेमाचा नायक!संबंधित विषय
ताज्या बातम्या