Advertisement

टाॅर्चमन संदिप बनला सिनेमाचा नायक!

एके काळी सिनेमागृहांमधील अंधारात प्रेक्षकांना टाॅर्च दाखवून आपल्या सीटपर्यंत पोहोचणारा संदिप आज त्या अंधारातून बाहेर पडून कॅमेऱ्याच्या माध्यमातून झगमगत्या रुपेरी पडद्यावर पोहोचला आहे

टाॅर्चमन संदिप बनला सिनेमाचा नायक!
SHARES

मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येतं हे आजवर बऱ्याच दिग्गजांनी दाखवून दिलं आहे. सिनेसृष्टीतही अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत स्वत:ला सिद्ध केलं आहे. याच वाटेने जात सिनेमागृहातील एक टाॅर्चमन थेट सिनेमाचा नायक बनला आहे.


'रॉकी'चा ट्रेलर

‘राॅकी’ हा मराठी सिनेमा ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवोदित दिग्दर्शक अदनान शेखने या सिनेमात एका लढवय्या तरुणाची कथा सादर केली आहे. ‘राॅकी’ या शीर्षकाप्रमाणेच राॅकींग असलेला सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या अँक्शनपॅक्ड सिनेमात संदिप साळवे हा नवा चेहरा मुख्य भूमिकेत आहे. संदिपने केवळ सिनेमाच्या पडद्यावर नव्हे, तर खाजगी जीवनातही खूप मेहनत घेऊन नायक बनण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.


प्रेरणादायी प्रवास

संदिपबाबत सांगायचं तर त्याचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे, पण त्याचा इथवरचा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे. एके काळी सिनेमागृहांमधील अंधारात प्रेक्षकांना टाॅर्च दाखवून आपल्या सीटपर्यंत पोहोचणारा संदिप आज त्या अंधारातून बाहेर पडून कॅमेऱ्याच्या माध्यमातून झगमगत्या रुपेरी पडद्यावर पोहोचला आहे. संदिपचा हा स्वप्नवत वाटावा असा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणारा असा आहे.


हलाखीची परिस्थिती

नायक बनण्याच्या आपल्या प्रवासाबाबत संदिप म्हणाला की, मी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. २००३ मध्ये मी चेंबूरमधील अमर थिएटरमध्ये टाॅर्चमनचं काम करायचो. या सिनेमाचा दिग्दर्शक आणि माझा परममित्र अदनान शेखने मला त्या अंधारातून सिनेमाच्या पडद्यावर आणलं. आई हाऊसकिपींगचं काम करायची. वडीलही गारमेंटमध्ये नोकरीला. त्यामुळे घरची परिस्थिती हालाखीची होती. तरीही न डगमगता खडतर परिश्रम करत राहिलो. आज त्याचं फळ मिळालं आहे.


संदिपचं डॅशिंग रूप

संदिपचा पहिला सिनेमा असलेल्या ‘राॅकी’चं दिग्दर्शन करणाऱ्या अदनानने यापूर्वी हिंदीतील कोरिओग्राफर-दिग्दर्शक अहमद खान यांच्यासोबत काम केलं आहे. त्याची झलक ‘राॅकी’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. या सिनेमात संदिपच्या जोडीला अक्षया हिंदळकर मुख्य भूमिकेत आहे. मुख्य भूमिका असलेला तिचाही हा पहिलाच सिनेमा आहे. मात्र, शीर्षक भूमिकेत असलेल्या संदिपचं ‘राॅकी’मध्ये एक डॅशिंग रूप पाहायला मिळणार यात शंका नाही.



हेही वाचा -

एसएससीचं टेन्शन दूर करणार '१० वी'?

सई, तेजस्विनी, सिध्दार्थ, उमेशच्या गायन-नृत्याचा जलवा !



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा