Advertisement

सई, तेजस्विनी, सिध्दार्थ, उमेशच्या गायन-नृत्याचा जलवा !

संजयचा 'लकी' हा आगामी सिनेमाही याला अपवाद नाही. या सिनेमाच्या टायटल ट्रॅकमध्ये तर मराठीतील चार मोठ्या कलाकारांचा जलवा पाहायला मिळणार आहे.

सई, तेजस्विनी, सिध्दार्थ, उमेशच्या गायन-नृत्याचा जलवा !
SHARES

एकाच चित्रपटात इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांना पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. दिग्दर्शक संजय जाधवच्या सिनेमात नेहमीच बड्या कलाकारांची गर्दी असते. संजयचा 'लकी' हा आगामी सिनेमाही याला अपवाद नाही. या सिनेमाच्या टायटल ट्रॅकमध्ये तर मराठीतील चार मोठ्या कलाकारांचा जलवा पाहायला मिळणार आहे.

संजयच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'लकी' सिनेमाचं टायटल ट्रॅक नुकतंच लाँच झालं आहे. अभय महाजन-दिप्ती सती या नव्या कोऱ्या जोडीसोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सुपरस्टार सई ताम्हणकर-सिध्दार्थ जाधव या सोहळ्याला उपस्थित होते. या गाण्यातील सई ताम्हणकर, तेजस्वीनी पंडीत, उमेश कामत आणि सिद्धार्थ जाधव यांचा अनोखा परफॅार्मंस प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे.


प्रेक्षकांची पसंती मिळेल

यापूर्वी संजयच्या याच चित्रपटातील 'कोपचा...' या गाण्याचं प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. टायटल ट्रॅकबाबत संजय म्हणाला की, या गाण्याच्या लाँचला खूप भारी प्रतिसाद मिळाला. टाळ्या, शिट्या आणि जल्लोषाने खच्चून भरलेल्या मॉलमध्ये गाणं लाँच करण्याचा अनुभव अद्भूत होता. प्रेक्षकांनी माझ्यावर आतापर्यंत जे प्रेम केलं आहे, त्याचा मी ऋणी आहे. त्यामुळेच 'लकी' सिनेमालाही ते असाच भरभरून प्रतिसाद देतील, मला विश्वास आहे.



मराठीतले चार स्टार पहिल्यांदाच एकत्र

यो(सचिन पाठक)ने लिहीलेल्या या गाण्याला संगीतकार अमितराज यांनी संगीतबध्द केलं आहे. सई, तेजस्विनी, सिध्दार्थ आणि उमेश यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं त्यांनी स्वत:च गायलं आहे. मराठी सिनेसृष्टीतले हे चार स्टार एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबत सई म्हणाली की, मी खूप लकी आहे, की संजयदादाच्या बऱ्याच सिनेमांचा मी भाग होऊ शकले. 'लकी' सिनेमात असणं, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.


चार वर्षांनंतर सई-तेजस्विनी एकत्र

फक्त 'येरेयेरे पैसा'च नाही, तर सई आणि माझ्यासाठीही 'तू हि रे' नंतरचंही हे रियुनियन आहे. 'तोळा तोळा...'नंतर चार वर्षानी मी आणि सई एका गाण्यातून पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहोत, असं म्हणत तेजस्वीनीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. या गण्याच्या अनुभवाबाबत उमेश म्हणाला की, 'लकी' सिनेमा सुरू होण्याच्या अगोदरच मी एका व्हिडीयोतून म्हणालो होतो, की मी 'लकी' असणार आहे. मी खरंच स्वत:ला लकी समजतो की, संजयदादासोबत मला पुन: पुन्हा काम करता येतं. सई, सिध्दू, तेजस्विनी आणि माझ्यावर चित्रीत झालेलं हे गाणे नक्कीच तुम्हांला आवडेल.



हेही वाचा -

मराठी सिनेमाच्या पोस्टरवरही क्लॅाथलेस हिरो!

आणि जितेंद्रने केला ‘कोपचा’ डान्स!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा