आणि जितेंद्रने केला ‘कोपचा’ डान्स!

बॉलिवूडमध्ये आजही जंपिंग जॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी मराठी गाण्यावर ताल धरत डान्स केला.

  • आणि जितेंद्रने केला ‘कोपचा’ डान्स!
  • आणि जितेंद्रने केला ‘कोपचा’ डान्स!
SHARE

बॉलिवूडमध्ये आजही जंपिंग जॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी मराठी गाण्यावर ताल धरत डान्स केला. औचित्य होतं ‘लकी’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर लाँच आणि ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष.


ट्रेलर लाँच

मुंबईतील आॅर्किड हाॅटेलमध्ये मोठ्या थाटात ‘लकी’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या सोहळ्याला ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र, डिस्को किंग बप्पी लाहिरी आणि तुषार कपूर यांची विशेष उपस्थिती होती. मराठी सिनेसृष्टीतील नामवंत सेलिब्रिटी आणि या दोन मान्यवरांच्या उपस्थितीने ‘लकी’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात रंगत आणली.


'कोपचा' गाण्यावर डान्स

याप्रसंगी ‘लकी’चा ट्रेलर दाखवण्यासोबतच नुकतंच लाँच झालेलं ‘कोपचा’ हे गाणंही दाखवण्यात आलं. हे गाणं जीतेंद्र यांना इतकं आवडलं की, त्यांनी थेट ‘लकी’ चित्रपटाचा नायक अभय महाजनसोबत 'कोपचा' या गाण्यावर आपल्या अनोख्या स्टाइल’ डान्समध्ये डान्स केला. खरं तर हे गाणं जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्या ‘नयनों में सपना’सारखं चित्रीत करण्यात आलं आहे. त्यामुळे जितेंद्र यांना ‘कोपचा’ या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही.तुफान कलाकारांचा सिनेमा

हे गाणं पाहिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना जितेंद्र म्हणाले की, या सिनेमाला नक्कीच बंपर ओपनिंग मिळेल असं शंका नंसल्याचं ‘लकी’चा ट्रेलर पाहिल्यावर मला वाटतं. सिनेमातलं केवळ हे गाणंच नव्हे, तर कलाकारही खूप छान आहेत. सिनेमाच्याच भाषेत सांगायचं झालं तर हा सिनेमा ‘तुफान’ कलाकारांचा आहे. या सिनेमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.


पार्श्वगायक म्हणून एंट्री

यंदा डिस्को किंग बप्पी लाहिरींना सिनेसृष्टीत ५० वर्ष पूर्ण होत असताना त्यांचा ‘लकी’मधील ‘कोपचा’ या गाण्याद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून एंट्री होत आहे. याचं सेलिब्रेशन केक कापून करण्यात आलं. यावेळी बप्पी म्हणाले की, ज्या मराठी मातीनं मला हे यश मिळवून दिलं, त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझा ५० वर्षांनंतर पार्श्वगायनात डेब्यू होतो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे गाणं माझ्या स्टाइलमधील असल्याने विशेष आनंद होत आहे.एक खास नातं

‘लकी’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित असलेला तुषार कपूर म्हणाला की, माझ्या वडिलांच्या ‘हिम्मतवाला’ या सिनेमाला ‘कोपचा’व्दारे दिलेला ट्रिब्यूट खूप आवडला. ‘गोलमाल’ सीरिजच्या सर्व सिनेमांमध्ये माझं नाव लकी असल्याने ‘लकी’ सिनेमासोबतही आता एक खास नातं जोडलं गेलं आहे. मागील १६ वर्षांपासून या सिनेमाचे निर्माते सूरज सिंग यांच्याशी माझे ऋणानुबंध आहेत. तर सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत ‘सी कंपनी’ सिनेमामध्ये काम केलं होतं. त्यामुळे ही माझी होम प्रॉडक्शन फिल्म असल्यासारखी वाटते.
हेही वाचा -

भरतसोबत 'प्रेमवारी'वर निघाले चिन्मय-मयूरी

मराठीमध्ये 'साइज झिरो' हिरोइनची एंट्री!संबंधित विषय
ताज्या बातम्या