Advertisement

भरतसोबत 'प्रेमवारी'वर निघाले चिन्मय-मयूरी

'प्रेमवारी' हा प्रेमावर आधारित असलेला आणखी एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना प्रेमाचा रंजक प्रवास पाहायला मिळणार आहे. अभिनेता भारत गणेशपुरेसह चिन्मय उदगीरकर आणि मयूरी कापडणे ही नवी कोरी जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

भरतसोबत 'प्रेमवारी'वर निघाले चिन्मय-मयूरी
SHARES

'प्रेमवारी' हा प्रेमावर आधारित असलेला आणखी एक नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना प्रेमाचा रंजक प्रवास पाहायला मिळणार आहे. अभिनेता भारत गणेशपुरेसह चिन्मय उदगीरकर आणि मयूरी कापडणे ही नवी कोरी जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

"पाखराला घ्यायची असते उंच आकाशात भरारी मनात आस ठेऊन भारी कधीतरी पूर्ण होईल त्यांची प्रेमवारी...." असं म्हणत नुकताच 'प्रेमवारी' या चित्रपटाचा ट्रेलर कलाकारांच्या उपस्थितीत रिलीज करण्यात आला. प्रेम या छोट्याशा शब्दाची न सांगता येणारी अशी व्यापक व्याख्या आहे. 'प्रेम' या शब्दाला कोणत्याच चौकटीत पूर्णपणे बसवता येत नाही. या प्रेमाची असंख्य रूपं आहेत त्यातील एका रूपाचं दर्शन या चित्रपटात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


केमिस्ट्री भावणार का?

चिन्मय आणि मयूरी या नव्या जोडीसोबत भारत गणेशपुरेची कॅामेडी हा या सिनेमाचा प्लस पॅाईट ठरणार आहे. चिन्मयने यापूर्वी बऱ्याच मालिका तसंच चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. पण मयूरीचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत भावते ते पाहायचं आहे. राहुल आणि पूजा यांची कॉलेजमध्ये होणारी भेट, त्यातून फुलत जाणारं प्रेम पण, याच प्रेमात अडसर ठरणाऱ्या काही गोष्टी आणि काही कारणामुळे परिवाराकडून होणारा विरोध. यात दोघांच्या प्रेमाचा प्रवास कसा होतो ते या चित्रपटातच दखवण्यात आलं आहे.



८ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

चिन्मय-मयूरी आणि भारतसोबत या चित्रपटात अभिजित चव्हाण, नम्रता पावसकर, राजेश नन्नावरे, निशा माने, प्रियांका उबाळे, विशाल खिरे हे कलाकार देखील आहेत. हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे.


अमितराजचं संगीत

मराठीतील सध्याचा आघाडीचा संगीतकार असलेल्या अमितराजनं या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. वैशाली सामंत, श्रेया घोषाल, आदर्श शिंदे आणि सोनू निगम यांनी आपल्या मधुर आवाजाने गाण्यांना सूर दिला आहे. या चित्रपटाचं लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र गायकवाड यांनी केलं असून, प्रस्तुतकर्त्याची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे.



हेही वाचा -

पारधी समाजाची कथा सांगणार 'पारधाड'

बेस्ट संपाचा आठवा दिवस, आज तोडगा निघण्याची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा