Advertisement

मराठीमध्ये 'साइज झिरो' हिरोइनची एंट्री!

अनेकांच्या भुवया उंचवायला लावणारा 'लकी' नावाचा मराठी सिनेमा लवकरच येत असून या सिनेमाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच 'साइज झिरो' हिरोइनची एंट्री होणार आहे.

मराठीमध्ये 'साइज झिरो' हिरोइनची एंट्री!
SHARES

'साइज झिरो' हिरोइन म्हणजेच आपली फिगर दाखवत टू पीसमध्ये सीन देणारी नायिका हिंदी चित्रपटांसाठी काही नवी बाब नाही. पण मराठीत मात्र एखाद्या अभिनेत्रीने अशा प्रकारे एंट्री घेतली तर नक्कीच अनेकांच्या भुवया उंचावतील आणि आता हे लवकरच घडणार आहे. अनेकांच्या भुवया उंचवायला लावणारा 'लकी' नावाचा मराठी सिनेमा लवकरच येत असून या सिनेमाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच 'साइज झिरो' हिरोइनची एंट्री होणार आहे.


या नव्या तारकेची एन्ट्री


संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. पदार्पणातील सिनेमातच दिप्तीचा हॉट बिकिनी लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खर तर, साइज झिरो लूक, बिकिनी बॉडी आणि सेक्सी हिरोइन हे समीकरण बॉलीवूड सिनेमांमध्ये नवं नाही. मात्र मराठी फिल्म हिरोइनही अशा साइज झिरो, सेक्सी अंदाजात दिसणं हे नवीन आहे. थोडक्यात काय तर 'लकी' सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीलाही आता 'साइज झिरो' हिरोइन मिळाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.याआधी साऊथ सिनेमामध्ये होती झळकली

संजयने नेहमीच हटके स्टाइलमध्ये आपल्या चित्रपटांची पब्लिसिटी केली आहे. 'लकी' ही याला अपवाद नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजयच्या या चित्रपटात दिप्ती पहली हिरोइन असेल, जी बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. संजयच्या चित्रपटातील नायिका नेहमीच खूप सुंदर आणि सेक्सी दिसतात. मात्र संजयच्या एखाद्या सिनेमातल्या हिरोइनने बिकीनी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'लकी'च्या अगोदर साउथ सिनेमामध्ये दिसलेल्या दिप्तीनेही प्रथमच आॅनस्क्रीन बिकिनी सीन दिला आहे.
लकी काॅमेडी ड्रामा

'लकी'मधील आपल्या हॅाट अंदाजाबाबत दीप्ती म्हणाली की, मला जेव्हा या सिनेमात बिकिनी घालायची आहे, असं समजलं तेव्हा खरं तर मी थोडी नर्व्हस झाले होते. मात्र हा सिक्वेन्स चित्रपटाला कलाटणी देणारा ठरणार आहे, हे समजल्यावर मी तयार झाले. संजयदादांनी सीन खूप एस्थेटेकली चित्रीत केला आहे. मी कम्फर्टेबल असावं म्हणून दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि माझे हेअर-मेकअप आर्टिस्ट यांच्याखेरीज त्यावेळी सेटवर कोणीही नव्हतं.

'लकी' हा एक कॉमेडी ड्रामा आहे. कॉलेजविश्व आणि आजच्या तरूणाईविषयीचा हा सिनेमा आहे. त्यामुळे बिकनी घालणं हा या कथेतला एक भाग असल्याचंही दीप्ती म्हणाली. जसं आपण जिममध्ये जाताना स्पोर्ट्सवेयर घालतो किंवा कॉलेजमध्ये जाताना जिन्स-टी शर्टमध्ये असतो. तसंच स्विमींगपूलमध्ये टू पीस बिकनी घालतात. म्हणूनच बिकिनी सिनेमामध्ये दिसणार असल्याचंही तिने सांगितलं. ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत.हेही वाचा -

प्रियांका-सलमान ठरले 'बॉलीवूड ट्रेंडसेटर'!

तब्बल नऊ दिवसांनंतर मुंबईच्या रस्त्यावर धावल्या बेस्ट बस, संप मिटलासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा