Advertisement

प्रियांका-सलमान ठरले 'बॉलीवूड ट्रेंडसेटर'!

बाॅलिवूडचे ट्रेण्डसेंटर म्हणजे सलमान खान आणि नुकतीच विवाह बंधनात अडकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा. या दोघांनीही २०१८ चे ट्रेंडसेटर म्हणून बाजी मारली आहे.

प्रियांका-सलमान ठरले 'बॉलीवूड ट्रेंडसेटर'!
SHARES

खरं तर बॅालिवूडमधील प्रत्येक स्टार कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपला एक ट्रेंड सेट करत असतो. पण ज्या स्टारला लोकं फॅालो करतात तोच खरा बॅालिवूडचा ट्रेंडसेटर म्हणून ओळखला जातो. असेच बाॅलिवूडचे ट्रेण्डसेंटर म्हणजे सलमान खान आणि नुकतीच विवाह बंधनात अडकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा या दोघांनीही २०१८ चे ट्रेंडसेटर म्हणून बाजी मारली आहे.


सर्वाधिक चर्चीत कलाकार

सलमान खान आणि प्रियांका चोप्रासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी आली आहे. नुकत्याच आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालातून हे सिध्द झालं आहे की, सलमान आणि प्रियांका २०१८ मधले सर्वाधिक चर्चीत कलाकार होते. १ जानेवरी २०१८ पासून ३१ डिसेंबर २०१८ या संपूर्ण वर्षातील आकडेवारीनुसार, सर्वाधिक आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिलेले सलमान आणि प्रियांका २०१८ मधले 'बॉलीवूड ट्रेंडसेटर' ठरले आहेत.


सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

मागील वर्षभरामध्ये म्हणजेच १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ५२ आठवड्यांपैकी २४ आठवडे सलमान, तर २० आठवडे प्रियांका टॅापला होती, असं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवरून निदर्शनास आलं आहे. यावरून सलमान-प्रियांका हे सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड कलाकार असल्याचं समजतं. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.


मिडीया-सोशल मिडीयावरही दोघांचीही चलती

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, प्रियांका आणि सलमान २०१८ या संपूर्ण वर्षभरात सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून प्रकाशझोतात राहिले आहेत. सलमानचे विवाद असोत की कोर्टाचे खटले किंवा मग त्याचे सिनेमे. तो सातत्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमूळे वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसत होता. तिच गोष्ट प्रियंकाचीही आहे. निक जोनससोबतच्या अफेअरपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रियांका सातत्याने बातम्यांमध्ये होती. यामुळेच तिच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. सतत बातम्यांमध्ये राहिल्याने प्रियांका आणि सलमान बॉलीवूडचे ट्रेंडसेटर बनले आहेत.हेही वाचा -

भरतसोबत 'प्रेमवारी'वर निघाले चिन्मय-मयूरी

पारधी समाजाची कथा सांगणार 'पारधाड'संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा