Advertisement

मराठमोळ्या 'भुतियापंती'चं चित्रीकरण सुरू

मराठीत नेहमीच विविध विषयांवर आधारित पण काहीसं अनोखं शीर्षक असलेल्या चित्रपटांची निर्मिती होत असते. असाच एक काहीसं वेगळं शीर्षक असलेल्या 'भुतियापंती' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

मराठमोळ्या 'भुतियापंती'चं चित्रीकरण सुरू
SHARES

मराठीत नेहमीच विविध विषयांवर आधारित पण काहीसं अनोखं शीर्षक असलेल्या चित्रपटांची निर्मिती होत असते. असाच एक काहीसं वेगळं शीर्षक असलेल्या 'भुतियापंती' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. 


चित्रीकरण वेगात

गंमतीशीर, पण थरारक वाटावं असं शीर्षक असलेल्या 'भुतियापंती' या चित्रपटाच्या घोषणेनंतर लगेचच मुहूर्त करण्यात आला. थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि विनोद बरदाडे प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्माते विनोद बरदाडे आणि सहनिर्माते नरेश चव्हाण 'भुतियापंती'ची निर्मिती करीत आहेत. सध्या भोरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण वेगात सुरू आहे. दिग्दर्शक संचित यादव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं टायटल पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. 


दुसरा चित्रपट

मागील बऱ्याच वर्षांपासून अभिनय करणाऱ्या संचितचा 'भुतियापंती' हा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यानं 'बे एके बे' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शनासोबतच संचितनं या चित्रपटात महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखाही साकारली आहे. संचित सोबत अरूण नलावडे, कमलेश सावंत, पूर्णिमा वाव्हळ-यादव, अमित चव्हाण, तृशांत पाते, सुदेश म्हशीलकर, प्रभाकर मोरे, अंकुर वाडवे, आभा वेलणकर, संदीप जुवाटकर, मानसी संकपाळ, अमित शिंदे, समीर काळंबे, सचिन खंडागळे आदी कलाकार या चित्रपटात आहेत. 


अनाकलनीय गोष्टी

या चित्रपटात संजय खापरे मुख्य भूमिकेत होता. 'भुतियापंती'ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन विनय येरापले यांनी केलं आहे. या चित्रपटाबाबत संचित म्हणाला की, 'भुतियापंती' हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून, यातील महत्त्वपूर्ण मेसेज मानवी जीवनात उपयोगी पडणारा आहे. जीवनात संघर्ष करताना आपल्या आजूबाजूला बऱ्याच अनाकलनीय गोष्टी घडताना दिसत असतात. अशा गोष्टींकडं आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे ते हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना समजेल. 

'भुतियापंती'साठी येरापले यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अभिनय जगताप यांनी स्वरसाज चढवला असून, संतोष आंब्रे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. लवकेश विश्वकर्मा यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, सह-दिग्दर्शकाचं काम प्रकाश तांबे यांनी पाहिलं आहे. संजीव यादव कार्यकारी निर्माता असलेल्या या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देवेंद्र तावडे यांनी केलं आहे.



हेही वाचा -

ही मोदींची लाट नाही तर त्सुनामी- देवेंद्र फडणवीस

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात युती आघाडीवर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा