Advertisement

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात युती आघाडीवर

सतराव्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या मतमोजणीच्या सुरूवातीच्या टप्प्यात भाजपा शिवसेना महायुती आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस काहीसं पिछाडीवर पडलं आहे. तरीही राज्यातील काही महत्त्वाच्या जागांवर जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात युती आघाडीवर
SHARES

सतराव्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या मतमोजणीच्या सुरूवातीच्या टप्प्यात भाजपा शिवसेना महायुती आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेस काहीसं पिछाडीवर पडलं आहे. तरीही राज्यातील काही महत्त्वाच्या जागांवर जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. त्यात नांदेड, नागपूर, अमरावती, बारामती, मावळ, औरंगाबाद, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, उत्तर-मध्य मुंबई आणि रायगड या जागांचा समावेश आहे.

मुंबईतील जागांचा कल पाहता भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी ३ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ० जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपा ५ जागांवर, शिवसेना २ जागांवर, काँग्रेस २ जागांवर, तर राष्ट्रवादी ४ जागांवर आघाडीवर आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपा ३ जागांवर, शिवसेना १ जागेवर, काँग्रेस १ तर राष्ट्रवादीही १ जागेवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

कोकण-ठाण्यात भाजपा १ जागेवर शिवसेना ४ जागेवर तर राष्ट्रवादी १ जागेवर आघाडीवर आहे. मराठवाड्यात भाजपा २ जागांवर शिवसेना १ जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी २ तर वंचित बहुजन आघाडी १ जागेवर आघाडीवर आहे. तर विदर्भात भाजापा ५ जागांवर आणि शिवसेना २ जागांवर आघाडीवर आहे.हेही वाचा- 

देशात कुणाचं सरकार येणार? भाजपा की काँग्रेस?

मुंबईत कोण बाजी मारणार?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा