Advertisement

महेश काळे, तौफिक कुरेशी यांची जुगलबंदी

'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात तौफिक कुरेशी यांच्या जिम्बे या वाद्याबरोबरच अनेक वाद्यांचे दर्शन आणि त्याला साजेशी गाणी गायली जाणार आहेत. त्यामुळे हा भाग म्हणजे उत्तम गाणं आणि वाद्याचा अनोखा मिलाफ याने बहरलेला असेल.

महेश काळे, तौफिक कुरेशी यांची जुगलबंदी
SHARES

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून सेलेब्रिटी गायकांनी अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली. गायकांची विविध शैलीतील गाणी आणि त्यावर परिक्षकांचं उत्तम परीक्षण यामुळं या कार्यक्रमाची लज्जत कायमच वाढत गेली. प्रत्येक भागात येणारे विशेष अतिथी हेसुद्धा या कार्यक्रमाचं अाकर्षण ठरले अाहेत. येत्या १८,१९ डिसेंबरला सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणाऱ्या भागात अाता महेश काळे अाणि तौफिक कुरेशी यांची जुगलबंदी पाहायला मिळणार अाहे. 


तौफिक कुरेशींनी जिंकली मनं

येत्या आठवड्याची थीम आहे 'वाद्य विशेष'. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार तौफिक कुरेशी यांनी या भागात विशेष अतिथी लावत 'जिम्बे' या वाद्यावर रसिकांच्या मनावर गारुड केलं. 'जिम्बे' या वाद्याबरोबरच अनेक वाद्ये वाजवून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली अाहेत. त्यांच्या या वाद्यांना साजेशी अशी गाणीही गायली जाणार अाहेत.

 



संगीत-सूरांची जुगलबंदी

'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर संगीत आणि सूरांची जुगलबंदी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. महेश काळे याची गायिकी, तौफिक कुरेशी यांचे 'जिम्बे' हे वाद्य आणि ख्यातनाम सॅक्सोफोन वादक श्यामराजी यांची जुंगलबंदी पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यावेळी महेश काळे यानं 'अलबेला सजन आयो रे' या गाण्याचं सादरीकरण केलं अाहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा