Advertisement

सावंत यांच्या घरी आणखी एका कलाकाराचे आगमन

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' अस म्हणत अभिनयने प्रेक्षकांच्या मनात अपलं स्थान निर्माण केलं आहे. अभिनय त्याची मैत्रीण पूर्वा पंडित हिच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अभिनय आणि पूर्वाच्या लग्नामुळे निर्मिती सावंत या सासू झाल्या आहेत.

सावंत यांच्या घरी आणखी एका कलाकाराचे आगमन
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' अस म्हणत अभिनयने प्रेक्षकांच्या मनात अपलं स्थान निर्माण केलं आहे. अभिनय त्याची मैत्रीण पूर्वा पंडित हिच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अभिनय आणि पूर्वाच्या लग्नामुळे निर्मिती सावंत या सासू झाल्या आहेत.

आपल्या आईप्रमाणेच अभिनयने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने आता याच क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनयने पूर्वासोबत साखरपुडा करून त्याने त्यांच्या १२ वर्षांच्या मैत्रीला वेगळे नाव दिले आहे. त्यांने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. पूर्वासुद्धा अभिनेत्री आहे. त्यामुळे सावंतांच्या घरात आणखी एका कलाकारचं आगमन झालं आहे.


अभिनयाच्या लग्नाला मराठी कलाकारांची उपस्थिती

अभिनय सावंतच्या लग्नाला अनेक मराठी सेलेब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. 'आज मेरे भाई की शादी है' असे सुंदर कॅप्शनही तिने त्या सुंदर फोटोला दिले आहे. यावेळी पूर्वाने केलेली पारंपरिक वेशभूषा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.



प्राजक्ता माळी बरोबर रेणुका शहाणे, कविता लाड, शुभांगी गोखले, सोनाली कुलकर्णी, वंदना गुप्ते आदी कलाकार मंडळींनी हजेरी लावली. यावेळी केलेली धम्माल, मस्ती रेणुका शहाणे यांनी आपल्या कॅमेरात कैद केली आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा