सोनालीला मिळणार पेन्शन?

सिनीयर सोनाली कुलकर्णीला आता ‘पेन्शन’ मिळणार आहे. कदाचित ही बातमी वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे…

  • सोनालीला मिळणार पेन्शन?
  • सोनालीला मिळणार पेन्शन?
  • सोनालीला मिळणार पेन्शन?
  • सोनालीला मिळणार पेन्शन?
  • सोनालीला मिळणार पेन्शन?
  • सोनालीला मिळणार पेन्शन?
  • सोनालीला मिळणार पेन्शन?
SHARE

सिनीयर सोनाली कुलकर्णीला आता ‘पेन्शन’ मिळणार आहे. कदाचित ही बातमी वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे…

होय, चाहत्यांमध्ये ‘सो कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनाली कुलकर्णीला ‘पेन्शन’ मिळणार आहे. खरं तर पेन्शन ही उतारवयात मिळते. जेव्हा एखादी व्यक्ती निवृत्त होते, तेव्हा तिला पेन्शन मिळते, पण कलाकार तर कधीच निवृत्त होत नाहीत. मग सोनालीला ‘पेन्शन’ कशी मिळणार? हा प्रश्न सुजाण वाचकांना पडणं सहाजिक आहे. सोनालीला ‘पेन्शन’ मिळणार हे खरं असलं, तरी ती वास्तवात नसून, सिनेमात असेल हेही तितकंच खरं आहे.

मागील काही दिवसांपासून सोनाली आपल्या एका आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सोनाली भोर मुक्कामी आहे. ‘दप्तर’ आणि ‘विठा’ या सिनेमांचं दिग्दर्शन करणारे लेखक-दिग्दर्शक पुंडलीक धुमाळ सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या बिझी आहेत. या सिनेमाचं शीर्षकच ‘पेन्शन’ आहे. निर्माते रवी गोयल यांच्या सवीना क्रिएशन्स या होम प्रोडक्शनमध्ये ‘पेन्शन’ची निर्मिती केली जात आहे.

या सिनेमात सोनाली एका अशा स्त्रीची व्यक्तिरेखा साकारत आहे, जी केवळ ‘पेन्शन’च्या बळावर आपल्या लहान मुलांचा प्रतिकूल परिस्थितही सांभाळ करते. स्वत:चा उदरनिर्वाह करत ती मुलांचंही पालनपोषण करते. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘माधुरी’ या सिनेमात सोनालीचं काहीसं ग्लॅमरस तसंच त्रासलेलं रूप पहायला मिळालं होतं. त्यामुळं ‘पेन्शन’मध्ये तिनं साकारलेल्या व्यक्तिरेखेबाबतही कुतूहल निर्माण होतं. हा सिनेमा या वर्षा अखेरीस प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.हेही वाचा -

मराठीतील पहिलं थ्रीडी पोस्टर पाहिलं का?

या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा
संबंधित विषय
ताज्या बातम्या