Advertisement

मराठीतील पहिलं थ्रीडी पोस्टर पाहिलं का?

मराठी सिनेमात नेहमीच नवनवीन प्रयोग केले जात असतात. यामुळं लेखनापासून सादरीकरणापर्यंत सर्वच स्तरांवर वेगळेपण जाणवतं. आता मराठीतील पहिलं थ्रीडी पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

मराठीतील पहिलं थ्रीडी पोस्टर पाहिलं का?
SHARES

मराठी सिनेमात नेहमीच नवनवीन प्रयोग केले जात असतात. यामुळं लेखनापासून सादरीकरणापर्यंत सर्वच स्तरांवर वेगळेपण जाणवतं. आता मराठीतील पहिलं थ्रीडी पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘रॉम कॉंम’ या आगामी चित्रपटानं आपलं वेगळेपण सुरुवातीलाच दाखवलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मराठीत पहिल्यांदाच थ्रीडी पोस्टरचा प्रयोग करण्यात आला आहे. ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म यांनी ‘रॉम कॉंम’ या चित्रपटाची निर्मिती केली असून, सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते आहेत. सुशील शर्मा हे सहनिर्माते आहेत. रेमोलो एंटरटेन्मेंटच्या मोहन सचदेव यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून, गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘रॉम कॉंम’ हा चित्रपट नावाप्रमाणेच रॉम कॉम आहे. राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावं सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. चित्रपटाचं डिजीटल मार्केटिंग सांभाळणाऱ्या ‘इट्स सोशल टाईम’ यांच्या संकल्पनेतून या चित्रपटाचं थ्रीडी पोस्टर तयार करण्यात आलं आहे. आतापर्यंत थ्रीडी पोस्टरचा प्रयोग हॉलिवूडमध्ये आणि हिंदी चित्रपटांत करण्यात आला आहे. मात्र, मराठी चित्रपटांनी हा प्रयोग केला नव्हता. ती उणीव १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘रॉम कॉंम’ या चित्रपटानं भरून काढली आहे.



हेही वाचा -

अशोकमामांचा तातोबा साकारणार हा कलाकार

अक्षयला आताच का सुचला मेट्रोचा प्रवास?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा