Advertisement

'तुला पण बाशिंग बांधायचंय'निमित्ताने हे दोघे तिसऱ्यांदा एकत्र


'तुला पण बाशिंग बांधायचंय'निमित्ताने हे दोघे तिसऱ्यांदा एकत्र
SHARES

एखाद्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर काही कलाकारांचं एकमेकांशी चांगलंच ट्युनिंग जमतं. अनेकदा या ट्युनिंगमुळे एकत्र काम करण्याची संधीसुद्धा या कलाकारांना मिळते. ‘सैराट’ फेम अभिनेता सुरेश विश्वकर्मा आणि अभिनेत्री भक्ती चव्हाण यांच्याबाबतीतसुद्धा हा योग जुळून आला आहे.


'या' तीन चित्रपटात केलं एकत्रित काम

‘जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन’ यांची प्रस्तुती असलेला ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत. 'फॅँड्री’ आणि ‘सैराट’या सिनेमात एकत्रित काम केल्यानंतर ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक भानुदास व्यवहारे यांनी या दोघांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे या तीनही चित्रपटात सुरेश विश्वकर्मा हे पाटलाच्या भूमिकेत असून भक्ती चव्हाण यांनी त्यांच्या बायकोची म्हणजे पाटलीणीची भूमिका साकारली आहे. येत्या ३० मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


आम्ही दोघांनी फॅँड्री सिनेमापासून एकत्र काम केलं. या चित्रपटावेळी आमची जुजबी ओळख होती. त्यानंतर सैराटच्या वेळी आमचं ट्युनिंग चांगलंच जमलं. 'तुला पण बाशिंग बांधायचंय’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिग्दर्शकाला आम्हाला वेगळं काही सांगावं लागलं नाही इतकं चांगलं आमचं गिव्ह अँड टेक होतं. एकत्र काम केल्यानंतर हे ट्युनिंग सहज जुळू शकतं. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या चित्रपटात प्रेक्षकांना याची झलक निश्चित दिसेल.
- सुरेश विश्वकर्मा, अभिनेता

या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे आणि दत्तात्रेय मोहिते यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनी सांभाळली आहे. या दोघांसोबत या चित्रपटात विक्रम गोखले, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले दिसतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा