Advertisement

‘Thank U विठ्ठला’ टीमची नवी कलाकृती लवकरच!


‘Thank U विठ्ठला’ टीमची नवी कलाकृती लवकरच!
SHARES

चांगली टीम जुळून आली की, निर्माण होणारी कलाकृती नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरते. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली चित्रपटाची टीम पुन्हा एकदा आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा त्यांनी नुकतीच केली असून चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या निवडीची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे. ‘Thank U विठ्ठला’ च्या यशानंतर चित्रपटाच्या टीमला नायजेरियातील महाराष्ट्र मंडळाकडून आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या रविवारी १२ नोव्हेंबरला नायजेरियाच्या ओझोन सिनेमागृहात ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला आहे.



‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटाच्या दरम्यान जुळलेले हे सूर लक्षात घेत नव्या कलाकृतीसाठी या टीमने परत एकदा पुढाकार घेतला आहे. निर्माते गोवर्धन काळे, कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी, दिग्दर्शक देवेंद्र जाधव, लेखक व सहनिर्माते एम. सलीम, सिनेमॅटोग्राफर दिनेश सिंग आता प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार? याविषयी उत्सुकता आहे.



हेही वाचा

वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार 'राजन'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा