Advertisement

‘Thank U विठ्ठला’ सिनेमाचं महेश मांजरेकर यांच्या हस्ते म्युझिक लॉन्च


‘Thank U विठ्ठला’ सिनेमाचं महेश मांजरेकर यांच्या हस्ते म्युझिक लॉन्च
SHARES

हल्ली मराठी सिनेमांच्या विषयांमध्ये खूप विविधता पाहायला मिळत आहे. अशाच एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘Thank U विठ्ठला’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याहस्ते पार पडला. या वेळी अनेक मान्यवरांनीही उपास्थिती लावली होती. या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटातील गाण्याची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली.

मनोरंजनाच्या माध्यमातून चांगला संदेश देणारा ‘Thank U विठ्ठला’ हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं अभिनेता महेश मांजरेकर यांनी या प्रसंगी सांगितलं. मी आणि मकरंद अनासपुरेनी ‘Thank U विठ्ठला’च्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी एकत्र काम केलं असून आम्ही जितका हा चित्रपट एन्जॉय केला, तितकाच तो प्रेक्षकही एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी याप्रसंगी व्यक्त केला.



प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेला आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा या चित्रपटात पहाता येईल.



विजय शिंदे, दीपक कांबळी, मच्छिंद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळ्या जॉनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत.



३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

ट्विटरवर 100K चा टप्पा गाठणारी अमृता पहिली मराठी अभिनेत्री!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा