ट्विटरवर 100K चा टप्पा गाठणारी अमृता पहिली मराठी अभिनेत्री!


SHARE

सोशल मीडिया हा आता सगळ्यांच्याच आयुष्यातला अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सोशल साईटवर शेअर करणं हे काही नवीन नाही. मग यात सामान्य लोकांपासून ते अगदी सेलेब्रेटींपर्यंत सगळ्यांचाच समावेश पाहायला मिळतो.

गेल्या काही दिवसांपासून अमृता खानविलकरच्या नावाची बरीच चर्चा सुरु होती. मग ते तिचं डान्स इंडिया डान्स रिऍलिटी शोचं अँकरिंग असो किंवा मग तिच्या फॅशनची चर्चा असो. पण आता चर्चा होतेय ती अमृताच्या फॉलोअर्सची. ट्विटरवर १,००,००० फॉलोअर्स झालेली अमृता पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे.

अमृता तिच्या फॅन्सशी नेहमीच कनेक्टेड असते. ट्विटरवर जवळपास ५० च्या घरात तिच्या नावाचे फॅनक्लब्स आहेत. अमृता खानविलकरची प्रसिद्धी आपण मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही पाहू शकतो. तिची आणि बॉलिवुडस्टार रणवीर सिंगची घट्ट मैत्रीही आपल्याला तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिसते. आता १,००,००० फॉलोअर्स झाल्यानंतर अमृता खूप खूश आहे. तिने आपला आनंद एका व्हिडीओद्वारे इंस्टाग्रामवर शेअर केलाय.हेही वाचा

...म्हणून ते किशोर कुमार होते!


संबंधित विषय