Advertisement

‘शेर शिवराज’मध्ये 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार अफजल खान

अफजलखानाची भूमिका या चित्रपटात कोण साकरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या चित्रपटातील अफजलखानाचा पहिला लूक नुकताच समोर आला आहे.

‘शेर शिवराज’मध्ये 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार अफजल खान
SHARES

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे ‘शेर शिवराज’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

दरम्यान अफजलखानाची भूमिका या चित्रपटात कोण साकरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या चित्रपटातील अफजलखानाचा पहिला लूक नुकताच समोर आला आहे.

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील विविध खलनायकांची नाव यासाठी चर्चेत होती. पण अफजल खानाची भूमिका यातील नेमके कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचे उत्तर अखेर समोर आले आहे.

चिन्मय मांडलेकरनं शेअर केलेल्या या नव्या पोस्टरमध्ये स्वत: चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसत आहे. त्यासोबतच जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी दिसत आहेत.

तसंच या नव्या पोस्टरमध्ये अफजल खानाची झलक पाहायला मिळत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात त्याने खलनायकांच्या भूमिका साकारल्या आहेत.

चिन्मयने हे पोस्टर शेअर करताना अहोरात्र अन्याय-अत्याचार सहन करत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला…दाही दिशा थरथरल्या, काळ पुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि प्रचंड गर्जना करत प्रकटला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह…..’शेर शिवराज’ २२ एप्रिल २०२२, असे कॅप्शन दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा