अंकुश चौधरीने 'असा' साजरा केला 'बालदिन'!


SHARE

14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन. 'लहान मुलं, देवाघरची फुलं' असं म्हटलं जातं. याच फुलांसोबत म्हणजेच अशा अनेक लहान मुलांसोबत अभिनेता अंकुश चौधरी याने बालदिन साजरा केला. १४ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत असलेल्या 'बालदिना'चे औचित्य साधत, निलांबरी या बिनछताच्या बसमध्ये काही गरजू आणि अनाथ मुलांबरोबर त्याने बालदिनाचा आनंद लुटला.'देवा' या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने, आपल्या लाडक्या अंकुशसोबत काही वेळ घालवण्याची नामी संधी बच्चे कंपनीने पुरेपूर लुटली. खास करून, निलांबरी बसमधून मरीन ड्राईव्हची अविस्मरणीय सफरीचा त्यांनी मनमुराद आनंद लुटला.लोकांना मदत करणा-या 'देवा'ची भूमिका अंकुश त्याच्या आगामी सिनेमात साकारात असून, ख-या आयुष्यात देखील तो अगदी 'देवा' या पात्रासारखाच आहे. अंकुशने स्वतः त्याच्या परीने अनेकांना मदत केली असून, सामाजिक कार्यात देखील तो नेहमीच पुढे असतो. अंकुशने या सर्व मुलांसोबत गप्पा-गोष्टी करत, त्यांना खाऊ आणि भेटवस्तूदेखील दिल्या.हेही वाचा

'सारेगमप' - घे पंगा,कर दंगा !


संबंधित विषय