Advertisement

'नाय वरनभात लोन्चा...' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरुन हटवला

हा चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

'नाय वरनभात लोन्चा...' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरुन हटवला
SHARES

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा आगामी चित्रपट 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. हा चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

मात्र तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला होता. परंतू या ट्रेलरमध्ये दाखण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगानं या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली होती.

१४ जानेवारी रोजी 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृष्यांमुळे राष्ट्रीय महिला आयोगानं या चित्रपटाचा विरोध करत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.

ट्रेलरमध्ये आक्षेपार्ह दृश्यं दाखवण्यात आली होती. त्यामुळे महिला आयोगाने या ट्रेलरला विरोध केला आहे. हा ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतू तो आता सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे.

'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात महिला आणि लहान मुलांबद्दल आक्षेपार्ह दृष्ये आणि भाषा वापरण्यात आल्याच्या तक्रारी पालकांकडून महिला आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना पत्र लिहून याबाबत लेखी खुलासा करण्यास सांगितले होते. चित्रपटाच्या ट्रेलरमधे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला आणि लहान मुलांची अवहेलना करण्यात आल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. याबाबत रूपाली चाकणकर यांनी ट्वीट देखील केलं आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानुसार, 'महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला.'

हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांत दाखल होतोय. 'अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं...' ही चित्रपटाच्या पोस्टरवरील ओळ लक्ष वेधून घेते. प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.



हेही वाचा

अखेर प्रतिक्षा संपली, पुष्पा 'या' दिवशी अॅमेझॉनवर हिंदीत प्रदर्शित होणार

लता मंगेशकर यांना घरातीलच कर्मचाऱ्याकडून कोरोनाची लागण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा