Advertisement

लता मंगेशकर यांना घरातीलच कर्मचाऱ्याकडून कोरोनाची लागण

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं आहे.

लता मंगेशकर यांना घरातीलच कर्मचाऱ्याकडून कोरोनाची लागण
SHARES

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना घरातील कर्मचार्‍यामार्फत कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. ९२ वर्षीय लता मंगेशकर क्वचितच घराबाहेर जातात.

कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षांपासून त्या घराबाहेर पडलेल्या नाहीत. दरम्यान लता मंगेशकर यांना घरातील कर्मचार्‍याकडून कोरोनाची लागण झाली आहे.

लता मंगेशकर यांच्या घरात अनेक कर्मचारी आहेत. ते कर्मचारी अनेकदा घराबाहेर काही वस्तू आणण्यासाठी जात असतात. दरम्यान घरातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लता दीदींची चाचणी करण्यात आली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

खबरदारी म्हणून लता मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना पुढील ७ ते ८ दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत.



हेही वाचा

अल्लू अर्जुनचा पुष्पा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा