Advertisement

अखेर प्रतिक्षा संपली, पुष्पा 'या' दिवशी अॅमेझॉनवर हिंदीत प्रदर्शित होणार

७ जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. पण आता हिंदीत प्रदर्शित होत आहे.

अखेर प्रतिक्षा संपली, पुष्पा 'या' दिवशी अॅमेझॉनवर हिंदीत प्रदर्शित होणार
SHARES

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत प्रेक्षकांना १४ जानेवारीपासून पाहता येणार आहे. तर ७ जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.

'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. २०२२ मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलनं देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

पुष्पा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तरीदेखील सिनेमा कोट्यवधींची कमाई करतो आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमानं हिंदींत ८० कोटींचा टप्पा पार केला आहे.

पहिल्या आठवड्यात सिनेमानं २६ कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात २० कोटी कमवले. तर तिसऱ्या आठवड्यात २५ कोटींची कमाई करत सिनेमानं तीन आठवड्यात ७२ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमानं ८१.५८ कोटींची कमाई केली आहे.हेही वाचा

लता मंगेशकर यांना घरातीलच कर्मचाऱ्याकडून कोरोनाची लागण

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा