Advertisement

'देवा' सिनेमाचा अफलातून ट्रेलर लाँच!


'देवा' सिनेमाचा अफलातून ट्रेलर लाँच!
SHARES

'देवा' सिनेमाच्या चर्चेला आता वेग आला आहे. या सिनेमाच्या प्रसिद्धीचे अनोखे फंडे लोकांना आवडतायत. नुकतेच या सिनेमाचा ट्रेलर आणि प्रमोशनल साँग हटके स्टाईलने लॉन्च करण्यात आले. 'देवा' या सिनेमातील प्रमुख पात्राचे अतरंगी घर त्यासाठी उभारण्यात आले होते. विविध आश्चर्यांनी या घरात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' या अतरंगी पात्राचे पोस्टर जितके कलरफुल आहे, तितकाच कलरफुल या सिनेमाचा ट्रेलर पाहायला मिळाला. अंकुशचा ‘देवा’ लूक आणि तेजस्विनीच्या ‘माया’ या भूमिकेबरोबरच आणखी एक गोड धक्का मिळाला, तो म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीदेखील या सिनेमामध्ये आहे. शिवाय दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचीदेखील झलक यात दिसत असल्यामुळे, त्यांच्या आठवणीलादेखील या कार्यक्रमात उजाळा मिळाला.देवा सिनेमाच्या प्रमोशनल साँगलाही उपस्थितांनी भरभरून दाद दिली. अजय गोगावले यांचा कमालीचा आवाज या गाण्याला लाभला असून, प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने वेगळ्या पठडीतले गाणे अजयने गायले आहे. आयुष्याची विस्कटलेली घडी उलगडणारा हा 'देवा', प्रेक्षकांना पडलेले एक कोडे असून, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हे कोडे सुटणार आहे.हेही वाचा

'देवा' च्या अँथम साँगला प्रभूदेवाने दिली दाद!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा