Advertisement

उमेश कामत आणि तेजश्री प्रधान म्हणतात 'यू नो व्हॉट'


उमेश कामत आणि तेजश्री प्रधान म्हणतात 'यू नो व्हॉट'
SHARES

मराठी सिनेमाचे विषय, संकलन, मांडणी आणि दिग्दर्शनाबरोबरच संगीतातही आज विविध प्रयोग होताना दिसून येत आहे. सिनेमाच्या कथानकाला बांधून ठेवण्यास महत्त्वपूर्ण असलेल्या या संगीताचे, एक वेगळेच रूप आपल्याला आगामी 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. झेलू एन्टरटेंन्मेंट्सची निर्मिती असलेला असेही एकदा व्हावे या सिनेमातील 'यू नो व्हॉट?' ही कविता अल्पावधीतच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

उमेश कामत आणि तेजश्री प्रधानने म्हंटलेली ही कविता वैभव जोशी याने शब्दबद्ध केली असून, तिला अद्वैत पटवर्धनने अप्रतिम पार्श्वसंगीत दिले आहे. 'यू नो व्हॉट' या कवितेचं गाण्यात रुपांतर न करता, त्याचे बोल उमेश आणि तेजश्रीकडून वदवून घेण्याची किमया दिग्दर्शक सुश्रुत भागवतने साधली आहे.

या कवितेत उमेश कामतने गिटारदेखील वाजवली आहे. या कवितेसाठी उमेशने अद्वैतकडून गिटारचं प्रशिक्षण घेतलं. या कवितेच्या चित्रिकरणादरम्यान अद्वैत पूर्णवेळ सेटवर उपस्थित होता. पार्श्वसंगीताचा हा एक वेगळाच प्रकार असून, ब्लॅक एंड व्हाईटमध्ये ती लोकांसमोर सादर करण्यात आली आहे'. उमेशच्या कल्पनेतली तेजश्री दाखवणारी ही कविता, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असून, अल्पावधीतच या कवितेने सोशल नेट्वर्किंग साईटवर तुफान प्रसिद्धी मिळवली आहे.
- सुश्रुत भागवत, दिग्दर्शक



येत्या ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात उमेश तेजश्री या जोडीबरोबरच शर्वाणी पिल्लई हिचीदेखील विशेष भूमिका आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा