Advertisement

स्मिता तांबे, अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत ‘हडळ’ सिनेमाचा मुहूर्त


स्मिता तांबे, अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत ‘हडळ’ सिनेमाचा मुहूर्त
SHARES

विनोदी आणि मनोरंजनाचे मसाले ठासून भरलेल्या सिनेमांच्या तुलनेत भयपटांची संख्या फार कमी असते. त्यामुळेच एखादा भयपट येणार असला की, त्याबद्दल उत्सुकता वाढते. आता ‘हडळ’ असं शीर्षक असलेला नवीन मराठी चित्रपट बनणार आहे. या सिनेमाचा मुहूर्त लेखक अरविंद जगताप आणि अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत संपन्न झाला.

या सोहळ्याला सिनेमातील कलाकार-तंत्रज्ञही उपस्थित होते. ‘आर. डी. फिल्म्स प्रोडक्शन’ अंतर्गत निर्माते राजेश-दिनेश ही जोडी ‘हडळ’ या सिनेमाची निर्मिती करत आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन राकेश भारद्वाज करणार आहे.


सिनेमाची कथा?

शीर्षकावरून ‘हडळ’ हा जरी भयपट वाटत असला तरी हा सिनेमा भयावह नसून क्षणोक्षणी उत्कंठा वाढवत समज-गैरसमजांच्या कक्षा ओलांडणारा असल्याचं लेखक-दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. या सिनेमाची कथा कोकणच्या निसर्गरम्य भूमीत घडणारी आहे. या सिनेमात प्रेक्षकांना आवडणारं सारं काही असेल. कोकणाच्या निसर्गसौंदर्याच्या जोडीला सशक्त कथानकही असेल. त्याला श्रवणीय संगीत आणि विनोदाची झालरही असेल.

स्मिता तांबेसह मिलिंद शिंदे, संजय खापरे, विद्याधर जोशी, वर्षा धांदळे, अशोक कुलकर्णी, अभिषेक भामरे आदी कलाकार या सिनेमात दिसणार आहेत.


हेही वाचा - 

शेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेमाचा नायक

‘बे एके बे’ सिनेमाचं संगीत प्रकाशीत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा