Advertisement

‘बे एके बे’ सिनेमाचं संगीत प्रकाशीत


‘बे एके बे’ सिनेमाचं संगीत प्रकाशीत
SHARES

मराठीत विविधांगी विषयावर आधारित असलेल्या सिनेमांची जणू रेलचेलच असते. यापैकीच एक असलेल्या ‘बे एके बे’ सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईत कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


सुमधुर संगीताचा साज 

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था आणि तिथल्या लोकांची मानसिकता यावर आधारित असलेल्या ‘बे एके बे’ या सिनेमाला सुमधुर संगीताचा साज चढवण्यात आला आहे. संगीत प्रकाशन सोहळयाला सिनेमाचे निर्माते विकास भगेरीया, पूर्णिमा वाव्हळ-यादव, हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा, अनिता महेश्वरी, सहनिर्माते प्रविण गरजे, चिंतामणी पंडित, केदार दिघे, मयूर नाईक, झी म्युझिकचे आदित्य निकम, दिग्दर्शक संचित यादव, संगीतकार विलास गुरव, गायक ऋषिकेश रानडे, सागर सावरकर, राहुल सुहास, जितेंद्र सिंग, कलाकार संजय खापरे, संतोष आंब्रे आणि तंत्रज्ञांनी मराठी सिनेसृष्टीतील काही मान्यवर मंडळींनीही हजेरी लावली.


गाण्यातून हुतूतूचा थरार 

या सिनेमात एकूण पाच गाणी आहेत. यापैकी “यं वयदिका मंत्र...’’ या प्रार्थनेसोबतच ऋषिकेश रानडेने ‘‘जनसेवा ही ईश्वर भक्ती...’’ हे गाणंही गायलं आहे. ‘‘काव काव, चिव चिव...’’ या काहीशा इरसाल गाण्यासोबतच ‘‘हुतुतूचा खेळ...’’ हे गाणं गात सागर सावरकरने या गीतात हुतूतू या खेळाचा थरार आणण्याचा प्रयत्न केला आहे. ही तीनही गीतं संचित यांनीच लिहिली आहेत. अभिजीत कुलकर्णी यांनी लिहिलेला पोवाडा राहुल सुहासने गायला आहे. याखेरीज अभिजीत यांनी या सिनेमाचं टायटल साँगही लिहिलं आहे. हे गाणं जितेंद्र सिंग यांच्या आवाजात रसिकांना ऐकायला मिळेल. या पाचही गीतांना संगीतकार विलास गुरव यांनी संगीत दिलं आहे.


शिक्षकाची कथा

‘बे एके बे’ची कथा पृथ्वीच्या पाठीवर कुठेही घडणारी अशी आहे. ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या एका शिक्षकाभोवती या सिनेमाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. आपण स्वीकारलेलं कार्य इमाने इतबारे करत ज्ञानदानाचा अखंड यज्ञ सर्वसामान्यांसाठी खुला करणाऱ्या या शिक्षकाला कोणत्या प्रकारच्या दिव्यातून जावं लागतं, त्याची कथा या सिनेमात पाहायला मिळेल.

अभिजीत कुलकर्णीचं संवादलेखन 

या सिनेमात जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ-यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या प्रमुख भूमिका असून साहिल सितारे, प्रथम सितारे, वैदेही ओव्हाळ, स्नेहल भाताडे, सागर गुरव, संचित निर्मळे, पार्थ देशपांडे, अथर्व खारवरकर, साईराज कामेतकर, स्वप्नजा जाधव, समिषा स्लपे, प्राची मेस्त्री, पूजा पोटफाडे, नेहा पावसकर, अविष्कार शेडये आदी बालकलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिजीत कुलकर्णी यांनी ‘बे एके बे’चं संवादलेखन केलं.



हेही वाचा -

‘रमाई’च्या रूपात भेटणार ‘लालबागची राणी’

सुबोध-श्रृतीच्या ‘शुभ लग्न'ची पत्रिका!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा