SHARE

समाजातील वास्तव मार्मिकपणे मांडत प्रेक्षकांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारा ‘फांदी’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या उद्देशाने मुंबईत दाखल झालेल्या अजित साबळे या नवोदित दिग्दर्शकानं ‘फांदी’चं दिग्दर्शन केलं आहे. ‘ध्वज क्रिएशनची’ प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाच्या कथा, पटकथा, संवादलेखनाची जबाबदारीही अजितनेच सांभाळली आहे. २० जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


चित्रपटाची कथा?

काहीजण स्वत:च्या फायद्यासाठी अंधश्रद्धेचं जाळं कशाप्रकारे पसरवतात हे दाखवतानाच एका कुटुबांची राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून केली जाणरी फसवणूक हा चित्रपट मांडतो. ‘फांदी’ या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूरमधील आजरा तालुक्यात आणि चित्रनगरी गोरेगाव येथे करण्यात आलं आहे.


चित्रपटात यांच्या भूमिका

अरुण नलावडे, भूषण घाडी, नितीन आनंद बोढारे, संदीप जुवाटकर, विशाल सावंत, अमोल देसाई, बाबा करडे, सतीश हांडे, फिरोज फकीर, भाग्यश्री शिंदे, स्नेहा सोनावणे, सुगंधा सावंत, चंदा जांभळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या