Advertisement

पडद्यावरील आई गेली! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवली

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींवर अंत्यसंस्कार ५ जून रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार आहे.

पडद्यावरील आई गेली! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवली
SHARES

ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री सुलोचना दिदी उर्फ सुलोचना लाटकर यांचे (वय ९५ , कला कारकीर्द ७० वर्ष) यांचे दादर येथे आज सायंकाळी निधन झाले.

सुलोचना ताई यांची कारकिर्द पाहता, सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई त्यांनी पडद्यावर उत्तमपणे वठवली. ती असंख्य रसिकांना भावली.

मराठी चित्रपटसृष्टी गाजवली

सुलोचना दिदींचे अनेक चित्रपट खूपच गाजले. 1953-54 मध्ये सुलोचना यांचे ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे सिनेमे खूप गाजले. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले.

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

सुलोचना दिदींचे काही खास चित्रपट

सुलोचना दिदींचे मोतीलाल यांच्या बरोबरचा ‘मुक्ती’ हा चित्रपटही गाजला. त्यानंतर त्यांनी सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांच्या सोबतही काम केले. नायिका म्हणून त्यांनी 30 ते 40 चित्रपट केले असतील. ‘दिल देके देखो’ या 1959 मधील सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

त्यानंतर 1995 पर्यंत त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या ‘आई’ची भूमिका वठवली. मराठीत त्यांनी 50, तर हिंदीत 250 सिनेमे केले. सुलोचना दीदींना 1999 मध्ये ‘पद्मश्री’, तर 2009 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा