Advertisement

‘अराररारा...’ प्रविण तरडेने केला ‘खतरनाक’ डान्स

तुम्ही कधी ‘भाईटम साँग’ बघितलं आहे का? प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे भाईटम साँग आहे. नुकतंच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘अराररारा...’ प्रविण तरडेने केला ‘खतरनाक’ डान्स
SHARES

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लेखनासोबतच लहानसहान भूमिकांमध्ये दिसलेला लेखक-अभिनेता प्रवीण तरडे ‘देऊळ बंद’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनाच्या रिंगणात उतरला. ‘मुळशी पॅटर्न’ या स्वदिग्दर्शनाखाली तयार झालेल्या दुसऱ्या सिनेमात प्रवीण आता चक्क डान्स करताना दिसणार आहे.




भाईटम साँग

मराठी-हिंदी चित्रपटांपासून सर्व भाषिक सिनेमांमध्ये आज आयटम साँग ही काॅमन गोष्ट झाली आहे. त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री डान्स करताना दिसतात. क्वचीत प्रसंगी अभिनेत्यांनी आयटम नंबर केल्याची बॉलीवूडमध्ये उदाहरणं आहेत. मात्र तुम्ही कधी ‘भाईटम साँग’ बघितलं आहे का? प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे  भाईटम साँग आहे. नुकतंच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.


भाईच्या वाढदिवसाचा जल्लोष

‘मुळशी पॅटर्न' या चित्रपटाची निर्मिती अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांनी केली अाहे. या चित्रपटाचे किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स आहेत. आयटम साँगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम साँगची खासियत म्हणजे, शहरातील सगळ्यात मोठ्या भाईच्या वाढदिवसाच्या जल्लोषावर आधारलेलं हे गाणे आहे. त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून वर्तमान काळातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवरही भाष्य करण्यात आलं आहे.


गुन्हेगारीचं भीषण वास्तव 

आजवर प्रवीण हा लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत, पण या भाईटम साँगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्याचा डान्स पाहायला मिळणार आहे. या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केलं असून, नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिलं असून, आदर्श शिंदे यांनी गायलं आहे. चित्रपटातील हे गाणे मनोरंजन करणारं असलं तरी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नांवर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावांतील गुन्हेगारीचं भीषण वास्तव मांडणारा आहे.


song link

https://www.youtube.com/watch?v=F4_La1CbFv0



हेही वाचा -

सुमित-मृणाल पहिल्यांदाच एकत्र

इन्स्टावर श्रद्धा बनली लोकप्रिय ‘स्त्री’!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा