Advertisement

बंजारा महोत्सवाचं कफ परेडला आयोजन


बंजारा महोत्सवाचं कफ परेडला आयोजन
SHARES

आंबेडकरनगर - कफ परेडमधील आंबेडकरनगर येथे सोमवारी संध्याकाळी बंजारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बंजारा समाजाकडून या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवात बंजारा समाजाच्या तरुणींनी पांरपारिक वेशभूषेत नृत्यं सादर केली. या वेळी शिवसेना कुलाबा विधानसभा संघटक कृष्णा पवळे यांनी सहभागी तरुणींचं कौतुकही केलं. नगरसेवक गणेश सानप, शाखाप्रमुख मनोहर पाटील, बंजारा समाज असोसिएशनचे अध्यक्ष कुश्य चव्हाण, शिवसैनिक आणि बंजारा समाजाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा