Advertisement

माधुरी पवार बनली महाराष्ट्राची पहिली अप्सरा

मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातील नृत्यांगनांनी सजलेल्या ‘अप्सरा आली’ या शोची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. या शोमध्ये सहभागी झालेल्या १४ अप्सरांमधून निवडण्यात आलेल्या टॉप पाच अप्सरांनी महाअंतिम फेरीत धडक मारत आपली नृत्य अदाकारी सादर केली.

माधुरी पवार बनली महाराष्ट्राची पहिली अप्सरा
SHARES

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेलं टॅलेंट जगासमोर आणणारे आज बरेच रिअलिटी शोज सुरू आहेत. मात्र महाराष्ट्राच्या लावणी परंपरेचा वारसा जपणाऱ्या ‘अप्सरा आली’ या शोची रंगत काही औरच असल्याचं प्रेक्षकांनी अनुभवलं आहे. या शोची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. ज्यात साताऱ्याच्या माधुरी पवारनं बाजी मारत महाराष्ट्राची पहिली अप्सरा बनण्याचा मान पटकावला.


पाच अप्सरा महाअंतिम फेरीत

मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातील नृत्यांगनांनी सजलेल्या ‘अप्सरा आली’ या शोची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. या शोमध्ये सहभागी झालेल्या १४ अप्सरांमधून निवडण्यात आलेल्या टॉप पाच अप्सरांनी महाअंतिम फेरीत धडक मारत आपली नृत्य अदाकारी सादर केली. मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा, पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी या पाच जणींनी महाअंतिम फेरीत आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स सादर केला.


नृत्याची जुगलबंदी

पारंपरिक लावणीचा साज आणि अस्सल मराठी मातीतील लावणी करत बंदा रुपया परफॉर्मन्सचा मानकरी ठरलेल्या साताऱ्याची गुलछडी माधुरी पवारनं अख्ख्या महाराष्ट्राला लावणीच्या ठेक्यावर ताल धरायला लावला. तिला ऐश्वर्या काळे, ऋतुजा राणे, किन्नरी दामा व श्वेता परदेशी यांनी जबदस्त टक्कर देत महाअंतिम फेरीतील आव्हान अधिक तगडं केलं. त्यामुळं महाअंतिम फेरीत जणू नृत्याची जुगलबंदीच रंगली. मात्र चौघींना मात देत माधुरी पवारनं बाजी मारली.


स्पेशल नृत्य 

महागुरू सचिन पिळगावकर यांनी महाअप्सरांच्या अदाकारीनं रंगलेल्या या कार्यक्रमाचं परीक्षण केलं. प्रेम, आपुलकी व खिलाडूवृत्तीनं पाचही अप्सरांनी अंतिम सोहळ्यात आपापला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स सादर केला. सोनाली कुलकर्णी, दीपाली सय्यद आणि सुरेखा पुणेकर या परीक्षकांनीही महाअंतिम फेरीत स्पेशल नृत्य सादर करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला.हेही वाचा - 

सावधान, पुढे गाव आहे'!

राजामौलींसाठी आलिया बनणार सीता!
संबंधित विषय
Advertisement