Advertisement

दुबईत 'जल्लोष' करणार अवधूत-श्रेयस

अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांच्या 'जल्लोष २०१८' या म्युझिकल कॉन्सर्टची तयारी सध्या जोरात सुरू आहे. याच महिन्यात दुबईमध्ये ही म्युझिकल काॅन्सर्ट रंगणार आहे. या कॉन्सर्टमध्ये मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या आणि अविस्मरणीय अशा गाण्यांचा समावेश असणार आहे.

दुबईत 'जल्लोष' करणार अवधूत-श्रेयस
SHARES

गायन, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन, प्रस्तुती आणि अभिनय अशी चतुरस्र कामगिरी करणारा अवधूत गुप्ते सध्या एका काॅन्सर्टच्या तयारीत गुंग आहे. ही म्युझिकल काॅन्सर्ट भारतात रंगणार नसून दुबईत होणार आहे. या कामी त्याला चित्रपट निर्माता आणि मराठी रॅपर श्रेयस जाधव मोलाची साथ देणार आहे.


विस्मरणीय गाणी

अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांच्या 'जल्लोष २०१८' या म्युझिकल कॉन्सर्टची तयारी सध्या जोरात सुरू आहे. याच महिन्यात दुबईमध्ये ही म्युझिकल काॅन्सर्ट रंगणार आहे. या  कॉन्सर्टमध्ये मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या आणि अविस्मरणीय अशा गाण्यांचा समावेश असणार आहे.  सोबतच या गाण्यांना  थोडा फ्युजन टचदेखील देण्यात येणार आहे. या शोमध्ये अवधूतसोबत किंग जेडी म्हणजेच श्रेयस जाधवही परफॅार्म करणार आहे. 


२ गायक एकाच स्टेजवर 

अवधूत हा त्याच्या गाण्यांसोबतच 'झेंडा', 'मोरया' या गाजलेल्या चित्रपटांसाठीही ओळखला जातो, तर श्रेयस हा मराठी रॅपर आहे. रॅपर म्हणून श्रेयसची काही गाणीही गाजली आहेत. याशिवाय त्याची वेगळी ओळख म्हणजे त्याने काही मराठी चित्रपटांची निर्मितीही केली आहे. या दोन गायकांना एकाच स्टेजवर परफॉर्म करताना पाहण्याची अनोखी संधी दुबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. 


स्पृहाचं सूत्रसंचालन

अभिनेत्री स्पृहा जोशीचं धमाकेदार सूत्रसंचालन हे दुबईकरांसाठी एक सरप्राईझ पॅकेज ठरणार आहे.  संगीताला भाषेचं बंधन नसतं. म्हणूनच तर दुबईमध्ये होणाऱ्या मराठी मातीचा गंध असलेल्या या शोबद्दल तिथल्या संगीतप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच या शोच्या तिकीट बुकिंगला जोरदार प्रतिसादही मिळत आहे. २१ डिसेंबरला होणारा हा भव्य शो गणराज असोसिएट्स, मिराकी इव्हेंट्स आणि मोरया इव्हेंट्सच्या सहयोगाने दुबई सादर केला जाणार आहे.हेही वाचा - 

'माऊली'ची जेजुरी-पंढरी वारी

शिर्डीपासून सुरू झाला 'प्रेमवारी'चा प्रवास!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा