Advertisement

शिर्डीपासून सुरू झाला 'प्रेमवारी'चा प्रवास!


शिर्डीपासून सुरू झाला 'प्रेमवारी'चा प्रवास!
SHARES

आपल्या चित्रपटाचं शीर्षक इतरांपेक्षा खूप वेगळं आणि लक्षवेधी असावं असं प्रत्येक लेखक-दिग्दर्शकाला वाटत असतं. त्यामुळेच नवनवीन संकल्पनेतून चित्रपटाला त्यातील विषयाला साजेसं शीर्षक देण्यात येत असतं. असंच एक आगळं वेगळं शीर्षक असलेला 'प्रेमवारी' हा चित्रपट पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


पोस्टरचं अनावरण 

प्रत्येकाच्या मनात प्रेमाबाबतची वेगवेगळी संकल्पना असू शकते. त्यामुळेच प्रत्येकजण 'प्रेम' या शब्दाचा अर्थ आपल्या सोयीने काढत असतो. याच न्यायानुसार प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपं देखील सर्वांसाठी वेगळी असू शकतात. 'प्रेमवारी' या चित्रपटाची कथा काहीशा याच संकल्पनेवर आधारित आहे. नुकतंच शिर्डी येथे श्री साईबाबांच्या चरणी या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. 


रोमँटिक पोस्टर

शीर्षकाप्रमाणेच या चित्रपटाचं पोस्टरही रोमँटिक आहे. चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे ही या चित्रपटातील जोडी पोस्टरवर एका रोमँटिक पोझमध्ये दिसते. व्हॅलेंटाइन डेच्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारीला हा  सिनेमा रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डेचा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. या चित्रपटाद्वारे मयुरीच्या रूपाने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन चेहरा दाखल होत आहे. या चित्रपटातील गीतांना संगीत दिग्दर्शक अमितराजने संगीत दिलं आहे. लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी राजेंद्र गायकवाड यांनी सांभाळली आहे. 



हेही वाचा - 

‘मुंबई पुणे मुंबई ३’ची ३ दिवसांत ५ कोटींची कमाई!

Review: 'मुंबई पुणे मुंबई ३'- प्रसुतीच्या सुखद कळा!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा